नवी दिल्ली : पुढील वर्षी फेब्रुवारीत होणाऱ्या डेव्हिस चषक लढतीसाठी भारतीय टेनिस संघाला पाकिस्तानात जावेच लागणार आहे. अखिल भारतीय टेनिस संघटनेने (एआयटीए) सुरक्षेच्या कारणास्तव ही लढत पाकिस्तानऐवजी त्रयस्थ ठिकाणी खेळवण्याची विनंती आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाकडे (आयटीएफ) केली होती. मात्र, ‘आयटीएफ’च्या न्यायाधिकरणाने ही विनंती फेटाळून लावल्याने आता जागतिक गट-१ मधील लढतीसाठी भारतीय टेनिस संघाला तब्बल ६० वर्षांनंतर शेजारील देशात जावे लागणार आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबईत सोमवार पासून रंगणार आंतरराष्ट्रीय महिला टेनिस चॅम्पियनशिप, १७ देशांतील ६१ खेळाडू सहभागी होणार

IND vs AUS 3rd Test Match Timing Date Venue What Time Does the Gabba Test Start
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
allahabad highcourt
“हे हिंदुस्थान आहे, बहुसंख्याकांच्या इच्छेनुसारच देश चालणार”, न्यायाधीशांच्या वक्तव्याची चर्चा!
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
Australia Beat India by 10 Wickets in Pink Ball Test Pat Cummins 5 Wickets Nitish Reddy 42 Runs Inning
IND vs AUS: पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाची बाजी; भारतावर १० विकेट्सनी दणदणीत विजय

भारताच्या डेव्हिस चषक संघाने १९६४मध्ये अखेरचा पाकिस्तान दौरा केला होता. ‘‘आम्ही डेव्हिस चषक लढत त्रयस्थ ठिकाणी खेळण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, ‘आयटीएफ’च्या न्यायाधिकरणाने आमची विनंती फेटाळून लावली आहे. आम्ही सोमवारी क्रीडामंत्र्याची भेट घेऊन संघ पाकिस्तानात पाठवायचा की नाही, याबाबत चर्चा करू,’’ असे ‘एआयटीए’चे महासचिव अनिल धुपर म्हणाले.

न गेल्यास काय?

भारताने ३-४ फेब्रुवारीला इस्लामाबाद येथे होणारी लढत खेळण्यास नकार दिल्यास पाकिस्तानला विजेते म्हणून घोषित केले जाईल आणि भारताची जागतिक गट-२मध्ये पदावनती होईल.

Story img Loader