चेन्नई : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा भारतीय संघच जिंकणार असा मला विश्वास असून त्यांनी संपूर्ण स्पर्धेत जसा खेळ केला, तसाच अंतिम लढतीतही करावा, असे मत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार असून भारतापुढे पाच वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल. ‘‘भारतीय संघ दडपणाखाली असेल असे मला वाटत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> World Cup 2023 : रोहित शर्माच्या ‘त्या’ फोटोने कांगारुंची झोप उडवली, ऑस्ट्रेलियन फलंदाज चिंतेत, नेमकं कारण काय?

भारतीय संघ मायदेशात खेळत आहे, तसेच संघातील खेळाडू अनुभवी आहेत. त्यांनी काहीही वेगळे करण्याची गरज नाही. त्यांनी आतापर्यंत जसा खेळ केला आहे, तसाच अंतिम सामन्यातही करावा. भारतच विश्वचषक जिंकणार याची मला खात्री आहे. अंतिम सामन्यात त्यांचेच पारडे जड आहे. त्यांनी या संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे,’’ असे शास्त्री म्हणाले. ‘‘भारतीय संघातील खेळाडूंना त्यांच्या भूमिका ठाऊक आहेत. हा संघ एक किंवा दोन खेळाडूंवर अवलंबून नाही आणि हीच त्यांची सर्वोत्तम बाब आहे. आठ-नऊ खेळाडू दमदार कामगिरी करत भारताला सामने जिंकवून देत आहेत. भारताच्या दृष्टीने ही नक्कीच सकारात्मक बाब आहे,’’ असेही शास्त्री यांनी सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India will win world cup says former coach ravi shastri zws