नवी दिल्ली : भारतीय नेमबाजांनी कोरियात दाएगू येथे झालेल्या १५व्या एअरगन अजिंक्यपद स्पर्धेत २५ सुवर्णपदकांची कमाई करताना आपली छाप पाडली. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी भारताने दोन सुवर्णपदके पटकावली. मनू भाकर आणि सम्राट राणा जोडीने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कुमार गटात सांघिक सुवर्णपदक जिंकले. तसेच रिदम सांगवान आणि विजयवीर सिद्धू यांनी याच स्पर्धा प्रकारात वरिष्ठ गटातून सोनेरी यश मिळवले. त्यामुळे भारताने या स्पर्धेत २८ प्रकारांतून २५ सुवर्णपदके मिळवून वर्चस्व राखले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संगवान-सिद्धू जोडीने अचूक लक्ष्य साधताना मिश्र सांघिक गटात कझाकस्तानच्या व्हॅलेरी रखीमधान-इरिना युनुस्मेमटोवा जोडीचा १७-३ असा पराभव केला. शिवा नरवाल आणि युविका तोमर जोडीला कांस्यपदकाच्या लढतीत कोरियन जोडीकडून ६-१६ असा पराभव पत्करावा लागला. कुमार गटात याव स्पर्धा प्रकारात मनू-सम्राट जोडीने (५७८ गुण) पात्रता फेरीतून दुसऱ्या क्रमांकासह अंतिम फेरीत प्रवेश केला. उझबेकिस्तानची जोडी ५७९ गुणांसह आघाडीवर होती. अंतिम फेरीत मात्र भारतीय जोडीने उझबेकिस्तानच्या निगिना सैदकुलोवा-मुखम्मद कामालोव जोडीवर १७-३ अशी मात केली.