INDW vs WIW T20I Series: भारताच्या महिला संघाने ऑस्ट्रेलियातील क्लीन स्वीपनंतर मायदेशात मालिका विजय मिळवला आहे. भारतीय महिला संघ आणि वेस्ट इंडिजच्या संघामध्ये टी-२० मालिका खेळवली गेली. मालिकेची विजयाने सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. यानंतर तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात यजमान टीम इंडियाने स्मृती मानधना आणि ऋचा घोष यांच्या फलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजचा पराभव करत मालिका २-१ ने आपल्या नावे केली. यासह टीम इंडियाने ५ वर्षांनंतर मायदेशात टी-२० मालिका जिंकली आहे.

२०१९ नंतर, टीम इंडिया घरच्या मैदानावर द्विपक्षीय टी-२० मालिका जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. यापूर्वी, भारतीय महिला संघाने ऑक्टोबर २०१९ मध्ये घरच्या भूमीवर टी-२० मालिका जिंकली होती. या मालिका विजयासह भारताने खराब फॉर्मला मागे टाकत विजयाची चव चाखली आहे.

Virat Kohli and Anushka Sharma Will Leave India and Shift To London Soon Says His Childhood Coach Rajkumar Sharma
Virat-Anushka: विराट-अनुष्का भारत सोडून ‘या’ देशात कायमचे होणार स्थायिक, कोचने दिली धक्कादायक माहिती
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Assembly elections vidhan sabha Kunbi Maratha Number of Maratha MLA
विधानसभेत मराठा वर्चस्वाला शह; ओबीसींना बळ
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक फोन आला तर..”, रहिवाश्यांचा संताप, वैयक्तिक वाद विकोपाला!
RSS chief Mohan Bhagwat statement regarding Ram temple
‘राम मंदिर निर्मिती झाली, म्हणून कोणी हिंदूंचा नेता होत नाही’; सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन
Kalyan Crime News
Kalyan Crime : “मराठी माणसं भिकारी, त्यांना मारा”; म्हणत लोखंडी रॉडने मारहाण; कल्याणच्या सोसायटीत तुफान राडा, नेमकं काय घडलं?
kalyan news society viral video
Kalyan Society News: “कल्याणमध्ये मराठी माणसावर हल्ला, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे”, ठाकरे गटाची मागणी!
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा – IND vs AUS: विराट कोहली मेलबर्न विमानतळावर ऑस्ट्रेलियन मीडियावर का संतापला? महिला पत्रकाराशी वाद घालतानाचा VIDEO व्हायरल

स्मृती मानधना-ऋचा घोषची विक्रमी खेळी

तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताची फलंदाज रिचा घोष (५४) आणि सलामीवीर स्मृती मानधना (७७) यांनी अप्रतिम खेळी खेळली. ऋचा घोषने महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ चेंडूंमध्ये सर्वात वेगवान अर्धशतकाच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली, तर मानधनाने मालिकेत सलग तिसरे अर्धशतक झळकावून २० षटकांच्या फॉर्मेटमध्ये सर्वाधिक वेळेस ५० अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.

हेही वाचा – R Ashwin: “मला अजिबात पश्चाताप नाही, मी बऱ्याच जणांना…”, अश्विनचे निवृत्तीनंतर पहिलं वक्तव्य, राहत्या घरी पोहोचताच नेमकं काय म्हणाला?

स्मृतीने तिसऱ्या टी-२० सामन्यातील अर्धशतकासह वर्षातील आठवे अर्धशतक झळकावून या वर्षी टी-२० आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधील सर्वात यशस्वी फलंदाज ठरली. यावर्षी २३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तिच्या नावावर ७६३ धावा आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्मृतीने श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापट्टूला मागे टाकले आहे.

हेही वाचा – WTC Points Table: गाबा कसोटी ड्रॉ झाल्यानंतर WTC गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी? कसं आहे भारताचं फायनलसाठी समीकरण?

भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये २१७ धावांची विक्रमी धावसंख्या उभारली. भारताकडून स्मृती मानधनाने ७७ धावांची तर ऋचा घोषने ५४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर जेमिमा आणि राघवी बिश्त यांनी अनुक्रमे ३९ आणि ३१ धावांची शानदार खेळी केली. २१८ धावांच्या प्रत्युत्तरात वेस्टइंडिजच्या संघाने ठराविक अंतराने विकेट्स गमावत १५७ धावा करण्यात यशस्वी ठरला.

अशा प्रकारे टीम इंडियाने हा सामना ६० धावांनी जिंकून मालिका २-१ अशी जिंकली. झंझावाती अर्धशतकासाठी रिचा घोषला सामनावीर आणि स्मृती मानधनाला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. भारताकडून राधा यादवने सर्वाधिक ४ विकेट्स घेतले तर रेणुका ठाकूर सिंग, सजीवन सजना, तितास साधू आणि दिप्ती यांनी प्रत्येकी १-१ विकेट मिळवली.

Story img Loader