नवी मुंबई : यावर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेकडे पाहता भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेत सर्वच विभागांतील कामगिरी सुधारण्यावर भर राहील. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नुकतीच झालेली ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका ०-३ अशी गमवली. तर त्यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतही भारतीय संघाला हार पत्करावी लागली होती. भारताने इंग्लंड व ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यांत विजय मिळवला. मात्र, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्यांनी कामगिरी उंचावणे गरजेचे आहे.

हेही वाचा >>> IND vs SA 2nd Test : आयसीसीच्या दुटप्पी वृत्तीवर रोहित शर्मा संतापला; म्हणाला, ‘देश पाहून खेळपट्टीला रेटिंग…’

KL Rahul returns to nets after injury scare ahead BGT
KL Rahul : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! पर्थ कसोटी सामन्यापूर्वी ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीतून सावरला
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Australia Beat Pakistan by 29 Runs in 7 Over Game PAK vs AUS 1dt T20I Gabba Glenn Maxwell Fiery Inning
AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
Team India Performance in Border Gavaskar Trophy played at Australia
Team India : टीम इंडियाची ऑस्ट्रेलियामध्ये कामगिरी खूपच निराशाजनक, तब्बल ‘इतक्या’ वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत पत्करावा लागलाय पराभव
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने तब्बल सात झेल सोडले होते व त्यांना तीन धावांनी पराभूत व्हावे लागले होते. तर, तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८ बाद ३३८ धावा केल्या होत्या. मात्र, मोठया धावसंख्येचा पाठलाग करण्याच्या दडपणाखाली भारतीय फलंदाजांचा खेळ ढेपाळला आणि भारताचा डाव १४८ धावांतच आटोपला.

भारतासाठी कर्णधार हरमनप्रीतची कामगिरी चिंतेचा विषय ठरत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांत मिळून तिला केवळ १७ धावाच करता आल्या. जेमिमा रॉड्रिग्ज व रिचा घोष यांनी चांगली कामगिरी केली, पण त्यांना अन्य फलंदाजांची साथ मिळाली नाही. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाच्या फिबी लिचफील्ड व ताहलिया मॅकग्रा यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे व भारतीय गोलंदाजांसमोर त्यांना रोखण्याचे आव्हान असेल. एकमेव कसोटी सामना गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने जोरदार पुनरागमन केले. लिचफील्डने एकदिवसीय मालिकेत एक शतक व दोन अर्धशतके केली. विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक यंदा बांगलादेशमध्ये होणार असून एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन २०२५मध्ये भारतात होणार आहे.

उभय संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या ३१ ट्वेन्टी-२० सामन्यांपैकी केवळ सहा सामन्यांत भारताला विजय मिळवता आला आहे, तर २३ सामन्यांत त्यांनी हार पत्करली आहे. एक सामना रद्द करण्यात आला होता.

’ वेळ : सायं. ७ वा.

’ थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, जिओ सिनेमा

स्मृती, रेणुकावर भिस्त

एकदिवसीय मालिकेत सलामीवीर स्मृती मनधानाला चांगल्या सुरुवातीचे मोठया खेळीत रूपांतर करता आले नाही. मात्र, ट्वेन्टी-२० मालिकेत भारताला आक्रमक सुरुवात करून देण्याची जबाबदारी मनधानावर असेल. एकदिवसीय मालिकेत मनधानासह यास्तिका भाटियाने डावाची सुरुवात केली. मात्र, ट्वेन्टी-२० मालिकेत शफाली वर्माचे पुनरागमन अपेक्षित आहे. भारताच्या गोलंदाजीची भिस्त रेणुका सिंह ठाकूर व पूजा वस्त्रकार यांच्यावर असेल. नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमच्या नवीन खेळपट्टीकडून त्यांना मदत मिळण्याची दाट शक्यता आहे.