India vs Australia ICC Women’s T20 World Cup 2024 Match Highlights: आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२४मध्ये आज अ गटात भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ९ धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. १५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ २० षटकात ९ गडी गमावून १४२ धावाच करू शकला. कर्णधार हरमनप्रीत कौर शेवटच्या षटकापर्यंत क्रीजवर राहिली, पण संघाला विजयापर्यंत नेऊ शकली नाही. तिने ४७ चेंडूत ५४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.मात्र, टीम इंडियाचा उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग अधिकच खडतर झाला आहे. आता भारताला इतर संघाच्या सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.

Live Updates

India Women vs Australia Women Highlights : ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर १५२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघ २० षटकांत ९ गडी गमावून १४२ धावाच करू शकला.

23:25 (IST) 13 Oct 2024
IND vs AUS : टीम इंडियासाठी उपांत्य फेरी समीकरण काय आहे?

टीम इंडिया अजूनही अडचणीत आहे

भारतीय संघ अद्याप उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलेला नाही. टीम इंडियाला आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. या सामन्याच्या निकालानंतर भारतीय संघासाठी काही चित्र स्पष्ट होणार आहे. टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये जायचे असेल तर पाकिस्तानला न्यूझीलंड संघाचा पराभव करावा लागेल. याशिवाय भारताचा नेट रन रेट न्यूझीलंडपेक्षा चांगला असायला हवा. वर्ल्ड कप 2024 मधील भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर भारतीय संघाने पाकिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव केला. पण ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाला शेवटच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले.

23:14 (IST) 13 Oct 2024
IND vs AUS : भारताचा गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ धावांनी पराभव

भारताचा गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ धावांनी पराभव झाला आहे. उपांत्य फेरी गाठण्याच्या दृष्टिकोनातून हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा होता. टीम इंडियाच्या अजूनही उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम आहेत, मात्र यासाठी भाराताला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर शेवटच्या षटकापर्यंत क्रीजवर राहिली, पण संघाला विजयापर्यंत नेऊ शकली नाही. तिने ४७ चेंडूत ५४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.

https://twitter.com/GautamKuma84/status/1845520802130661412

22:49 (IST) 13 Oct 2024
IND vs AUS : भारताला विजयासाठी 28 धावांची गरज

भारताला विजयासाठी 28 धावांची गरज आहे, सामना रोमांचक टप्प्यावर

भारताला विजयासाठी 12 चेंडूत 28 धावांची गरज आहे. टीम इंडियाने 18 षटकांत 5 विकेट गमावून 124 धावा केल्या आहेत. हरमनप्रीत कौर 45 धावा करून खेळत आहे. पूजा 2 धावा करून खेळत आहे. स्पर्धा एका रोमांचक वळणावर पोहोचली आहे.

https://twitter.com/RajHomelander/status/1845514304860168429

22:45 (IST) 13 Oct 2024
IND vs AUS : भारताला विजयासाठी 40 धावांची गरज

भारताला विजयासाठी 40 धावांची गरज आहे

भारताला विजयासाठी 18 चेंडूत 40 धावांची गरज आहे. टीम इंडियाने 17 षटकांत 5 विकेट गमावून 112 धावा केल्या आहेत. हरमनप्रीत कौर 35 धावा करून खेळत आहे. पूजा वस्त्राकरला अद्याप खाते उघडता आलेले नाही. रिचा घोष 1 धावा करून बाद झाली.

https://twitter.com/RajHomelander/status/1845512131677937807

22:41 (IST) 13 Oct 2024
IND vs AUS : भारताला मोठा धक्का, दीप्ती शर्मा बाद

भारताला मोठा धक्का, दीप्ती शर्मा बाद

भारताला मोठा धक्का बसला आहे. दीप्ती शर्मा 25 चेंडूत 29 धावा करून बाद झाली. तिने 3 चौकारही मारले. सोफियाने दीप्तीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारताने 16 षटकांत 4 गडी गमावून 111 धावा केल्या आहेत. आता विजयासाठी 41 धावांची गरज आहे.

https://twitter.com/MidnightMusinng/status/1845511194372706396

22:35 (IST) 13 Oct 2024
IND vs AUS : भारताला विजयासाठी 62 धावांची गरज

भारताला विजयासाठी 62 धावांची गरज आहे

भारताला विजयासाठी 36 चेंडूत 62 धावांची गरज आहे. टीम इंडियाने 14 षटकांत 3 विकेट गमावून 90 धावा केल्या आहेत. हरमनप्रीत कौर 25 धावा करून खेळत आहे. दीप्ती 19 धावा करून खेळत आहे.

https://twitter.com/ajits_rathore/status/1845510877954322593

22:21 (IST) 13 Oct 2024
IND vs AUS : भारताला 8 षटकात विजयासाठी 73 धावांची गरज

भारताला 8 षटकात विजयासाठी 73 धावांची गरज आहे

भारताला विजयासाठी अजूनही 8 षटकात 73 धावा करायच्या आहेत. टीम इंडियाने 12 षटकात 3 विकेट्स गमावून 79 धावा केल्या आहेत. कर्णधार हरमनप्रीत कौरने 17 आणि दीप्ती शर्माने 16 धावा केल्या आहेत.

https://twitter.com/ProCricket10/status/1845507414906327461

22:11 (IST) 13 Oct 2024
IND vs AUS :भारताने 10 षटकात 3 गडी गमावून केल्या 67 धावा

भारताने 10 षटकात 3 गडी गमावून 67 धावा केल्या आहेत. टीम इंडियाला अजूनही विजयासाठी 85 धावांची गरज आहे. दीप्ती शर्माने 12 आणि हरमनप्रीत कौरने 9 धावांवर खेळत आहेत.

21:59 (IST) 13 Oct 2024
IND vs AUS : स्मृतीनंतर जेमिमा 16 धावा करून बाद झाली

जेमिमा 16 धावा करून बाद झाली

जेमिमा 16 धावा करून बाद झाली. मेगनने तिला गार्डनरकरवी झेलबाद केले. ऑस्ट्रेलियाने भारताला दिलेला हा तिसरा धक्का होता. दीप्ती शर्मा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आली आहे. तिला साथ देण्यासाठी हरमनप्रीत कौर क्रीझवर आहे. सात षटकांनंतर भारताची धावसंख्या 48/3 आहे.

21:50 (IST) 13 Oct 2024
IND vs AUS : टीम इंडियाला दुसरा धक्का, शफाली पाठोपाठ स्मृतीही बाद

टीम इंडियाला दुसरा धक्का, शफाली पाठोपाठ स्मृतीही बाद

भारताची दुसरी विकेट पडली. स्मृती मानधना 6 धावा करून बाद झाली. सोफियाने तिला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारताने 5.1 षटकात 40 धावा केल्या आहेत.

https://twitter.com/SuhailXnitrogen/status/1845499793306472498

21:40 (IST) 13 Oct 2024
IND vs AUS :ऑस्ट्रेलियाने भारताला दिला पहिला धक्का, शफाली 20 धावा करून बाद

भारताला पहिला धक्का, शफाली 20 धावा करून बाद

भारताला मोठा धक्का बसला आहे. शफाली वर्मा 13 चेंडूत 20 धावा करून बाद झाली. तिने 2 चौकार आणि 1 षटकार मारला. स्मृती मानधना सध्या 4 धावा करून खेळत आहे. भारताने 3.3 षटकात 1 गडी गमावून 26 धावा केल्या आहेत.

https://twitter.com/RajHomelander/status/1845496018948739203

21:36 (IST) 13 Oct 2024
IND vs AUS : स्मृती-शफालीकडून भारताच्या डावाला सावध सुरुवात

भारतीय संघाची धावसंख्या 2 षटकानंतर बिनबाद 13 धावा

152 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाने 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर एकही बिनबाद 13 धावा केल्या आहेत. शेफाली वर्मा 10 आणि स्मृती मानधना 3 धावांसह खेळत आहे. आता भारताला 18 षटकांत विजयासाठी आणखी 139 धावा करायच्या आहेत.

21:19 (IST) 13 Oct 2024
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने भारताला दिले १५२ धावांचे लक्ष्य

शारजाह मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या महिला T20 विश्वचषक 2024 च्या अ गटातील सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 विकेट गमावून 151 धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी ग्रेस हॅरिसच्या बॅटमधून 40 धावांची खेळी पाहायला मिळाली. तर भारताकडून गोलंदाजीत रेणुका सिंग आणि दीप्ती शर्मा यांनी 2-2 विकेट्स घेतल्या.

https://twitter.com/Amu0717_/status/1845491814226125061

21:12 (IST) 13 Oct 2024
IND vs AUS : श्रेयंका पाटीलने सदरलँडला केले बाद

ऑस्ट्रेलियाला 7 वा धक्का बसला

ऑस्ट्रेलियाची 7वी विकेट पडली. सदरलँड 10 धावा करून बाद झाला. त्याला श्रेयंका पाटीलने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ऑस्ट्रेलियन संघाने 19.4 षटकात 145 धावा केल्या आहेत.

https://twitter.com/NotDvija/status/1845489866525827406

21:07 (IST) 13 Oct 2024
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला बसला सहावा धक्का

ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का बसला

ऑस्ट्रेलियाची सहावी विकेट एलिस पेरीच्या रुपाने पडली. तिला 32 धावांवर दीप्ती शर्माने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ऑस्ट्रेलियाने 19 षटकांत 6 गडी गमावून 139 धावा केल्या आहेत.

https://twitter.com/VijaySikriwal/status/1845488908336820285

21:00 (IST) 13 Oct 2024
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने 17 षटकांनंतर 5 बाद 127 धावा केल्या

ऑस्ट्रेलियाने 17 षटकांनंतर 5 बाद 127 धावा केल्या

शारजाह येथे खेळल्या जात असलेल्या भारत विरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने 17 षटक संपल्यानंतर 5 गडी गमावून 127 धावा केल्या आहेत. एलिस पेरी 28 आणि लिचफिल्ड 6 धावांवर फलंदाजी करत आहे.

https://twitter.com/temba214/status/1845486425665413374

20:49 (IST) 13 Oct 2024
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का, गार्डनर बाद

ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का, गार्डनर बाद

ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येने 100 धावा ओलांडल्या आहेत. संघाने 15 षटकांत 5 गडी गमावून 101 धावा केल्या आहेत. संघाची पाचवी विकेट गार्डनरच्या रूपाने पडली. ती 6 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली.

https://twitter.com/ShuklaAnandbrat/status/1845483617155522810

20:40 (IST) 13 Oct 2024
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का, हॅरिस 40 धावा करून बाद

ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का, हॅरिस 40 धावा करून बाद

ऑस्ट्रेलियाची चौथी विकेट पडली. हॅरिस 40 धावा करून बाद झाला. दीप्ती शर्माने तिला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ऑस्ट्रेलिया संघाने 13.2 षटकांत 4 गडी गमावून 92 धावा केल्या आहेत.

https://twitter.com/imRchoudhary17/status/1845482023768465806

20:33 (IST) 13 Oct 2024
IND W vs AUS W : स्ट्रेलियाला तिसरा धक्का, मॅकग्रा बाद

ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का, मॅकग्रा बाद

ऑस्ट्रेलियाने 12 षटकात 3 गडी गमावून 80 धावा केल्या आहेत. हॅरिसने 32 धावा केल्या आहेत. पेरी 1 धाव घेतल्यानंतर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाची तिसरी विकेट मॅकग्राच्या रूपाने पडली. ती 32 धावा करून बाद झाली. राधा यादवने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

https://twitter.com/imRchoudhary17/status/1845480357618942227

20:26 (IST) 13 Oct 2024
IND W vs AUS W :हॅरिस-मॅकग्राने सावरला ऑस्ट्रेलियाचा डाव

महिला T20 विश्वचषक 2024 विरुद्ध भारताच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने 9 षटकांच्या अखेरीस 2 गडी गमावून 60 धावा केल्या आहेत. ग्रेस हॅरिस 25 आणि कर्णधार ताहलिया मॅकग्रा 21 धावांवर फलंदाजी करत आहे.

https://twitter.com/thefield_in/status/1845476946165346440

20:12 (IST) 13 Oct 2024
IND W vs AUS W : हॅरिस आणि मॅकग्रा यांच्यातील भागीदारी 35 धावांपर्यंत पोहोचली

ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 8 षटकात 52/2 आहे. हॅरिस आणि मॅकग्रा यांच्यातील भागीदारी 35 धावांपर्यंत पोहोचली आहे. मॅकग्राने 14 धावा केल्या असून हॅरिस सध्या 24 धावांसह खेळत आहे.

https://twitter.com/goldensports98/status/1845474681316356589

20:06 (IST) 13 Oct 2024
IND W vs AUS W : भारताने पॉवरप्लेमध्ये राखले वर्चस्व, ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २ बाद ३७ धावा

ऑस्ट्रेलियाने 6 षटकात 2 गडी गमावून 37 धावा केल्या आहेत. ग्रेस हॅरिस सध्या 16 धावांसह खेळत आहे आणि ताहिला मॅकग्रा 7 धावा केल्यानंतर तिच्यासोबत क्रीजवर आहे. भारताकडून रेणुका सिंगने 2 विकेट्स घेतल्या आहेत.

https://twitter.com/AmanRishabhRaj/status/1845472723356541100

20:00 (IST) 13 Oct 2024
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाची 4 षटकानंतर धावसंख्या २ बाद २४

ऑस्ट्रेलिया 4 षटकात 24/2

ऑस्ट्रेलियाने 4 षटकात 2 गडी गमावून 24 धावा केल्या आहेत. ग्रेस हॅरिसने 10 तर ताहिला मॅकग्राने 5 धावा करुन खेळत आहेत

https://twitter.com/VijaySikriwal/status/1845471909569245412

19:50 (IST) 13 Oct 2024
IND vs AUS : रेणुका सिंगने ऑस्ट्रेलियाला दिले सलग दोन धक्के

भारताच्या रेणुका सिंगने ऑस्ट्रेलियाला सलग दोन धक्के दिले. तिने मुनीनंतर जॉर्जियालाही बाद केले. तिला खातेही उघडता आले नाही. रेणुकाने 2 षटकात 15 धावा देत 2 बळी घेतले आहेत. ऑस्ट्रेलियाने 3 षटकात 2 गडी गमावून 18 धावा केल्या आहेत.

https://twitter.com/ShuklaAnandbrat/status/1845469629936013503

19:41 (IST) 13 Oct 2024
IND vs AUS : ऑस्ट्रेलियन संघासाठी बेथ मुनी आणि ग्रेस हॅरिस सलामी देत आहेत

ऑस्ट्रेलियन संघासाठी बेथ मुनी आणि ग्रेस हॅरिस सलामी देत आहेत

भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिला संघाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी बेथ मुनी आणि ग्रेस हॅरिस ही सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. रेणुका सिंग भारतीय संघासाठी डावातील पहिले षटक टाकत आहे.

https://twitter.com/RajasthaniJayka/status/1845466616685002758

19:15 (IST) 13 Oct 2024
IND vs AUS : पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत: शफाली वर्मा, स्मृति मानधना, हरमनप्रीत कौर (कर्णघार), जेमिमा रोड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ति शर्मा, पूजा वस्त्राकर, अरुंधति रेड्डी, श्रेयंका पाटिल, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग.

https://twitter.com/ICC/status/1845459487424987471

ऑस्ट्रेलिया : बेथ मूनी (यष्टीरक्षक), ग्रेस हॅरिस, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), जॉर्जिया वेरेहम, ॲनाबेल सदरलँड, सोफी मोलिनक्स, मेगन शुट, डार्सी ब्राउन.

19:10 (IST) 13 Oct 2024
IND W vs AUS W : ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, हीली दुखापतीमुळे बाहेर

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन कर्णधार ॲलिसा हिली दुखापतीमुळे या सामन्यात खेळणार नाही. तिच्या जागी ताहिला मॅकग्रा संघाचे नेतृत्व करत आहे.

https://twitter.com/ICC/status/1845457975156047958

18:58 (IST) 13 Oct 2024
IND vs AUS : भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का

भारताविरूद्धच्या मोठ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाची खेळाडू टायला व्लामिनेक ही दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेबाहेर झाली आहे. आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२४ च्या इव्हेंट तांत्रिक समितीने ऑस्ट्रेलियन संघात टायला व्लेमिनेकच्या जागी अष्टपैलू हीदर ग्रॅहमचा समावेश करण्यास मान्यता दिली आहे. म्हणजेच आगामी सामन्यांमध्ये टायला व्लेमिनेकची जागा हीदर ग्रॅहम घेईल. वेगवान गोलंदाज व्लामिनेकला शुक्रवारी पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या गट टप्प्यातील सामन्यात दुखापत झाली होती. पाकिस्तानच्या डावातील पहिले षटक क्षेत्ररक्षण करताना तिच्या खांद्याला दुखापत झाली.

18:53 (IST) 13 Oct 2024
IND W vs AUS W : उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला लावावा लागणार जोर

भारतीय महिला संघ रविवारी T20 विश्वचषक स्पर्धेत अनेकवेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. भारतासाठी हा करा किंवा मरो असा सामना असेल ज्यामध्ये उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्याला मोठा विजय नोंदवावा लागेल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाने मोहिमेची सुरुवात केली होती, परंतु पुढील दोन सामने जिंकून बाद फेरी गाठण्याच्या त्यांच्या शक्यता बळकट केल्या. मात्र, ऑस्ट्रेलियाचे आव्हान भारतासाठी सोपे जाणार नाही, पण ॲलिस हिलीच्या नेतृत्वाखालील संघ दुखापतींशी झुंजत आहे, ज्याचा फायदा भारतीय संघ घेऊ शकतो.

18:40 (IST) 13 Oct 2024
IND vs AUS : भारतासमोर सर्वात मोठे आव्हान

ऑस्ट्रेलियाविरूद्ध सामन्यात भारतासमोर सर्वात मोठे आव्हान ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचे असेल. भारतीय संघाच्या फलंदाजांना विशेषत: आघाडीच्या फळीतील फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. भारताच्या फलंदाजीच्या क्रमवारीत शफाली, हरमनप्रीत, स्मृती मानधना, जेमिमा यांचा समावेश आहे, जर त्यांनी धावा काढल्या तर कांगारू संघाला खडतर स्पर्धेला सामोरे जावे लागेल.

: India Women vs Australia Women T20 World Cup 2024 Live Score Updates in Marathi

IND-W vs AUS-W Highlights  score, ICC Women's T20 World Cup 2024 October 13, 2024 : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात आतापर्यंत ३५ टी-२० सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी ऑस्ट्रेलियाने २६ आणि भारताने ७ सामने जिंकले आहेत. तसेच एक सामना टाय झाला असून एकाचा निकाल लागला नाही.

Story img Loader