कॅन्टरबरी : कर्णधार हरमनप्रीत कौरचे (१११ चेंडूंत नाबाद १४३ धावा) आक्रमक शतक आणि नंतर रेणुका सिंगच्या (५७ धावांत ४ बळी) गोलंदाजीच्या बळावर भारतीय महिला संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर ८८ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. २३ वर्षांनंतर भारताचा इंग्लंडविरुद्ध हा पहिला मालिका विजय ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाने हरमनप्रीतच्या आक्रमक शतकामुळे ५ बाद ३३३ अशी मोठी धावसंख्या उभारली. यानंतर भारताने इंग्लंडला ४४.५ षटकांत २४५ धावसंख्येवर रोखले. भारताने १९९९ मध्ये इंग्लंडविरुद्ध २-१ अशी मालिका जिंकली होती.

भारताने दिलेल्या ३३४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर टॅमी बेमोंट (६) आणि सोफी डंकले (१) लवकर माघारी परतल्याने संघाच्या अडचणी वाढल्या. यानंतर अ‍ॅलिस कॅप्से (३९ धावा) आणि डॅनी वेटने (६५ धावा) संघाच्या धावसंख्येत भर घातली. या दोघी बाद झाल्यानंतर चार्ली डीन (३७ धावा) वगळता इतर फलंदाजांना फारसी चुणूक दाखवता आली नाही. भारताकडून रेणुकाला डी. हेमलताने (२/६) चांगली साथ दिली.

त्यापूर्वी, फलंदाजीला उतरलेल्या भारताच्या सलामीवीर शफाली वर्माला (८) या सामन्यातही छाप पाडता आली नाही. नंतर स्मृती मानधना (५१ चेंडूंत ४० धावा) आणि यास्तिका भाटिया

(२६ धावा) यांनी संघाचा डाव सावरला. या दोघीही माघारी परतल्यानंतर हरमनप्रीत आणि हरलीन देओल (७२ चेंडूंत ५८ धावा) यांच्या चौथ्या गडीसाठी ११३ धावांची निर्णायक भागीदारी रचली. हरलीन माघारी परतल्यानंतर हरमनप्रीतने आक्रमक खेळ करत भारताची धावसंख्या ३०० पार नेली. हरमनप्रीतने आपल्या खेळीत

१८ चौकार व चार षटकारांची आतषबाजी केली. १४३ ही तिची एकदिवसीय क्रिकेटमधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली.

झुलनच्या निरोपासाठी सज्ज -हरमनप्रीत

कॅन्टरबरी : इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आपला संघ अनुभवी भारतीय जलदगती गोलंदाज झुलन गोस्वामीला शनिवारी लॉर्ड्सवर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात निरोप देण्यासाठी सज्ज असल्याचे कर्णधार हरमनप्रीत कौरने सांगितले. ‘‘लॉर्ड्सवर होणारा शेवटचा सामना आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण झुलन या सामन्यात निवृत्ती घेणार आहे आणि आम्हाला कोणत्याही दबावाशिवाय या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. दुसऱ्या सामन्यात विजय मिळवल्याने मी आनंदित आहे आणि तिसऱ्या सामन्याचा आता आम्ही पुरेपूर आनंद घेऊ,’’असे सामन्यानंतर हरमनप्रीत म्हणाली.