ICC Women’s T20 World Cup 2024, IND vs NZ Highlights: टी-२० विश्वचषक २०२४ च्या चौथ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ५८ धावांनी पराभव केला आहे. महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील अ गटातील सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार सोफी डिव्हाईनच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत ४ गडी गमावून १६० धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली आणि संघाला १९ षटकांत सर्व गडी गमावून केवळ १०२ धावा करता आल्या.
India Women vs New Zealand Women Highlights: भारत वि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाच्या सामन्याचे हायलाईट्स
भारतीय संघ १०२ वर ऑल आऊट झाला असून तब्बल ५८ धावांनी भारताला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. मेयरने १९व्या षटकात पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर श्रेयंका आणि रेणुकाला बाद केले आणि भारतीय संघ ऑल आऊट झाला. यासह भारताला ५८ धावांना पराभव पत्करावा लागला आहे. भारताला विजयासाठी १६१ धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र एकाही फलंदाजाला मैदानात टिकता आले नाही आणि किवी संघ विजयी झाला. रोझमेरी मेयरने सर्वाधिक ४ विकेट घेतले.
ताहूहू आणि एमिली केरने भारताला पंधराव्या आणि सोळाव्या षटकात दोन धक्के दिले. दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकर बाद झाले. यासह भारताने ८ बाद ९४ धावा केल्या आहेत.
भारताने दीप्ती शर्माच्या रूपात सातवी विकेट गमावली आहे. मोठा फटका खेळण्याच्या नादात सोफी डिव्हाईनकडून झेलबाद झाली. यासह भारताने १०० धावांच्या आत ७ विकेट गमावल्या आहेत.
भारताचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. रिचा घोषनंतर भारताने अरूंधती रेड्डीची विकेटही गमावली आहे. १३ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मेयरने अरूंधतीला झेलबाद केले. भारताने १४ षटकांत ६ बाद ८६ धावा केल्या आहेत.
भारताचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. १० व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर ताहूहूने भारताची आशा असणाऱ्या रिचा घोषला झेलबाद केले. यासह भारताची धावसंख्या १० षटकांनंतर ५ बाद ७० धावा केल्या आहेत.
भारताने चौथी विकेट गमावली आहे. नवव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर लि ताहूहूने जेमिमाला ग्रीनकरवी झेलबाद झाली आहे. १० षटकांनंतर भारताने ४ बाद ६५ धावा केल्या आहेत.
भारताने ८ षटकांत ३ बाद ५३ धावा केल्या आहेत. रिचा घोष आणि जेमिमाची जोडी मैदानात आहे.
स्मृती मानधनानंतर भारतीय संघाला हरमनप्रीत कौरच्या रूपात अजून एक धक्का बसला आहे. मेरच्या सहाव्या षटकातील चौथ्या चेंडूवर हरमनप्रीत पायचीत झाली. भारताने रिव्ह्यू घेतला पण तरीही हरमनला तिसऱ्या पंचांनी बाद घोषित केले. यासह भारताने पॉवरप्लेमध्ये तीन मोठे विकेट गमावले आहेत.
भारताच्या डावातील पाचव्या षटकातील चौथ्या चेंडूवर भारताने स्मृती मानधनाची विकेट गमावली आहे. कार्सनने न्यूझीलंडला मोठी विकेट मिळवून दिली आहे. यासह भारताने ५ षटकांत २ बाद ३४ धाला केल्या आहेत.
भारतीय संघाने दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर विकेट गमावली. कार्सनच्या पहिल्या चेंडूवर शफाली वर्मा सरळ शॉट लगावला जो कार्सनने सहज टिपला आणि शफाली बाद झाली. भारताने २ षटकांत १बाद १५ धावा केल्या आहेत.
भारतीय संघाला विजयासाठी न्यूझीलंडने १६१ धावांचे लक्ष्य दिले आहे. भारताकडून स्मृती मानधना आणि शफाली वर्मा फलंदाजीसाठी आले आहेत. स्मृतीने पहिल्याच चेंडूवर चौकारासह तिने डावाला सुरूवात केली आहे. तर न्यूझीलंड संघानेही चौकार मारत सामन्याला सुरूवात करत होती.
न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईनने ३६ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने ५७ धावा करत संघाला १६० धावांच्या घरात पोहोचवले. यासह भारताला विजयासाठी १६१ धावांचे मोठे लक्ष्य मिळाले आहे. भारताकडून रेणुका सिंग ठाकूरने २ विकेट, आशा शोभना १ तर अरूंधती रॉयने १ विकेट घेतली. काही वेळेस भारताच्या साधारण यष्टीरक्षणाचा संघाला फटका बसला.
तुफान फटकेबाजी करत असलेल्या हॅलिडे आणि डिव्हाईनची भागीदारी रेणुका सिंगने तोडली. १९ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर स्मृती मानधनाने हॅलिडेला झेलबाद करत मोठी विकेट मिळवून दिली. यासह न्यूझीलंडने १९ षटकांत ४ बाद १४९ धावा केल्या आहेत.
श्रेयंका पाटीलच्या १६व्या षटकातील पाचव्या चेंडूवर भारताला विस्फोटक फलंदाज सोफी डिव्हाईनला बाद करण्याची मोठी संधी गमावली. श्रेयंकाच्या चेंडूवर सोफीने मोठा फटका मारल्याने चेंडू हवेत उंच गेला भारताचे दोन फिल्डर तिथे होते, पण चेंडू मैदानावर पडला. यासह न्यूझीलंडने १६ षटकांत ३ बाद ११७ धावा केल्या आहेत.
रेणुका सिंगच्या १५व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर जीवदान मिळालेल्या अमेलिया केरने मोठा फटका खेळला अन् बाद झाली. अमेलियाला १४ व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर डेड बॉलमुळे जीवदान मिळाले. अमेलिया १३ धावा करत बाद झाली. १५व्या षटकानंतर न्यूझीलंडची धावसंख्या ३ बाद १०९ धावा आहे.
१३ षटकांनंतर न्यूझीलंडने २ बाद ९३ धावा केल्या आहेत. अमेलिया केर १० धावा तर सोफी डिव्हाईन १७ धावा करत खेळत आहे.
भारत वि न्यूझीलंड सामन्यात किवी संघाने २ बाद ७२ धावा केल्या आहेत. भारताकडून अरूंधती रॉय आणि आशा शोभनाने प्रत्येकी एक विकेट मिळवून दिली. तर न्यूझीलंडकडून अमेलिया केर आणि सोफी डिव्हाईन फलंदाजी करत आहेत.
आशा शोभनाने नवव्या षटकात प्लिमरला बाद करवत भारताला दुसरी विकेट मिळवून दिली आहे. आशा शोभनाच्या ९व्या षटकातील पहिल्या चेंडूवर पुढे येऊन मोठा फटका खेळला. तर सीमाेषेजवळ उभ्या असलेल्या स्मृती मानधना उत्कृष्ट झेल टिपत भारताला दुसरी विकेट मिळवून दिली. यासह भारताने सामन्यात पुन्हा कमबॅक केलं आहे. ९ षटकांसह २ बाद ६८ धावांवर न्यूझीलंड खेळत आहे.
अरूंधती रॉयने आठव्या षटकात भारताला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला आहे. सूझी बेट्स २७ धावा करत बाद झाली. अरूंधतीच्या चेंडूवर मोठा फटका सूझीने लगावला पण सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या श्रेयंका पाटीलने शानदार झेल टिपत भारताला पहिली विकेट मिळवून दिली.
न्यूझीलंडने ६ षटकांत बिनबाद ५५ धावा केल्या आहेत. यादरम्यान सुझी बेट्स आणि प्लिमरने बेधडक फलंदाजी केली आहे. तर भारताने पहिला ब्रेकथ्रू मिळवण्याची संधी गमावली. तर काही ठिकाणी यष्टीरक्षण करतानाही काही चुका झाल्या. यासह भारताला आता पहिल्या विकेटची प्रतिक्षा आहे.
भारताकडून सहावे षटक टाकण्यासाठी अरूंधती रॉय आली होती. तिने भारताला पहिला ब्रेकथ्रू मिळवून देण्याची मोठी संधी निर्माण केली. बेट्सच्या बॅटची कड घेत चेंडू हवेत उंच उडाला यष्टीरक्षक ऋचा घोष तो झेल टिपण्यासाठी सरसावली पण चेंडू नीट टाईम न करू शकल्याने तो चेंडू हाताला लागून खाली पडला. अशारितीने भारताने पहिली विकेट मिळवण्यीची मोठी संधी गमावली.
न्यूझीलंड संघाने उत्कृष्ट फलंदाजी करत ५ षटकांत बिनबाद ४५ धावा केल्या आहेत. बेट्स १७ धावा तर प्लिमर २० धावांवर खेळत आहे. भारतीय संघ अजूनही विकेटच्या प्रतिक्षेत आहे.
न्यूझीलंड संघाच्या सलामीवीरांची चांगली फटकेबाजी सुरू आहे. पहिल्या ३ षटकांत किवी संघाने बिनबाद ३० धावा केल्या आहेत. पूजाच्या पहिल्या षटकात ९ धावा, रेणुकाच्या दुसऱ्या षटकात ४ धावा तर, दीप्तीच्या तिसऱ्या षटकात १४ धावा केल्या आहेत. यासह भारतीय संघ पहिल्या विकेटच्या प्रतिक्षेत आहे.
दोन षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या बिनबाद १४ धावांवर खेळत आहे. पहिले षटक पूजा वस्त्राकर तर दुसरे षटक रेणुका ठाकूरने टाकले. आता तिसरे षटक टाकण्यासाठी दीप्ती शर्माला पाचारण करण्यात आले आहेत.
भारत वि न्यूझीलंड सामन्याला सुरूवात झाली आहे. किवी संघाकडून सुझी बेट्स आणि जॉर्जिया प्लिमर यांनी डावाची सुरूवात केली तर भारताकडून पूजा वस्त्राकरने गोलंदाजीला सुरूवात केली. न्यूझीलंडने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत सुरूवात केली.
शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग
सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डेव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (यष्टीरक्षक), जेस केर, रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन
भारत वि न्यूझीलंड सामन्याची नाणेफेक न्यूझीलंड संघाने जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दक्षिण आफ्रिकेने टी-२० विश्वचषकातील पहिला सामना १० विकेटने जिंकला आहे. त्यांनी १७.५ षटकांत एकही विकेट न गमावता ११९ धावा करत सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेच्या विजयात लॉरा वोल्वार्डने ५९ आणि ताजमीन ब्रिट्सने ५७ धावांचे योगदान दिले. ताजमीन ब्रिट्सने ५२ चेंडूंच्या खेळीत ६ चौकार मारले. तर कर्णधार लॉरा वोल्वार्डने तिच्या ५५ चेंडूंच्या डावात ७ चौकार लगावले.
स्मृती मानधाना आणि हरमनप्रीत कौर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ३५००धावा पूर्ण करण्याच्या जवळ आहेत. मानधनाला ७ तर हरमनला ७४ धावांची गरज आहे. स्मृतीने १४१ सामन्यांच्या १३५ डावांमध्ये २८.८६ च्या सरासरीने आणि १२२.५१ च्या स्ट्राईक रेटने ३४९३ धावा केल्या आहेत. हरमनप्रीतने १७३ सामन्यांच्या १५३ डावांमध्ये २८.०८ च्या सरासरीने आणि १०७.३२ च्या स्ट्राईक रेटने ३४२६ धावा केल्या आहेत.