India vs Pakistan ICC Women’s T20 World Cup 2024 Highlights Match Updates : आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्धचा सामना ६ गडी राखून जिंकत गुणांचे खाते उघडले आहे. या सामन्यात पाकिस्तानी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर २० षटकात ८ गडी गमावून १०५ धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून फलंदाजी करताना निदा दारने सर्वाधिक २८ धावांची खेळी खेळली. भारताकडून गोलंदाजी करताना अरुंधती रेड्डी ३ विकेट्स घेतल्या होत्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून शफाली वर्माने ३२ धावांची तर कर्णधार हरमनप्रीत कौरने २९ धावांची खेळी साकारली. अरुंधती रेड्डीला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.
IND-W vs PAK-W Highlights score, ICC Women's T20 World Cup 2024 October 06, 2024 : भारत आणि पाकिस्तान टी-२० मध्ये आतापर्यंत एकूण १६ वेळा भिडले आहेत, ज्यामध्ये भारताने १४ आणि पाकिस्तानने २ सामने जिंकले आहेत.
गुण सारणीची स्थिती
अ गटातील गुणतालिकेवर नजर टाकली तर भारतीय संघ या विजयासह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या खात्यात दोन गुण आहेत. तथापि, त्याचा निव्वळ धावगती -1.217 आहे. आता भारतीय संघाला 9 ऑक्टोबरला याच मैदानावर श्रीलंकेविरुद्ध पुढील सामना खेळायचा आहे. त्याचबरोबर या पराभवाचा पाकिस्तानवर फारसा परिणाम झालेला नाही. फातिमा सनाचा संघ सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या खात्यात दोन गुण आहेत आणि निव्वळ रन रेट +0.555 आहे. न्यूझीलंड अव्वल तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर श्रीलंकेचा संघ शेवटच्या स्थानावर पोहोचला आहे.
महिला विश्वचषक 2024 स्पर्धेत आज भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव करत विजयाचे खाते उघडले.
पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी गमावून 105 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 18.5 षटकांत चार गडी गमावून 108 धावा केल्या आणि 6 विकेट्सनी सामना जिंकला.
पाकिस्तानचे सामन्यात पुनरागमन
फातिमा सनाने सलग 2 चेंडूत 2 फलंदाजांना बाद करत पाकिस्तानच्या आशा उंचावल्या आहेत. फातिमा सनाने जेमिमाह रॉड्रिग्ज आणि रिचा घोष यांना बाद केले. आता भारताची धावसंख्या 16 षटकांनंतर 4 गडी बाद 84 धावा आहे. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा क्रीजवर आहेत. वहीम, भारतीय संघाला विजयासाठी 24 चेंडूत 22 धावांची गरज आहे.
ओमाइमा हाऊसेलने शफाली वर्माला बाद केले
भारतीय संघाला दुसरा धक्का बसला आहे. स्मृती मानधना नंतर शफाली वर्मा बाद झाली. शफाली वर्माने 35 चेंडूत 32 धावांचे योगदान दिले. तिने आपल्या खेळीत 3 चौकार मारले. आता भारताची धावसंख्या 12 षटकांनंतर 2 बाद 62 धावा आहे. सध्या टीम इंडियाला विजयासाठी 48 चेंडूत 44 धावांची गरज आहे. त्याचवेळी भारताकडून जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर क्रीजवर आहेत.
10 षटकांनंतर भारताची धावसंख्या 1 गडी बाद 50 धावा
भारताची धावसंख्या 10 षटकांनंतर 1 गडी बाद 50 धावा. आता टीम इंडियाला शेवटच्या 60 चेंडूत विजयासाठी 56 धावांची गरज आहे. शफाली वर्मा 29 चेंडूत 24 धावा करून खेळत आहे. त्याचबरोबर जेमिमा रॉड्रिग्जने 15 चेंडूत 13 धावा केल्या आहेत. दोन्ही खेळाडूंमध्ये 33 चेंडूत 32 धावांची भागीदारी झाली आहे. तत्पूर्वी, स्मृती मानधना 16 चेंडूत 7 धावा करून बाद झाली. सादिया इक्बालने स्मृती मंधानाला बाद केले
भारताची धावसंख्या 7 षटकात 1 गडी बाद 31 धावा.
भारताची धावसंख्या 7 षटकांनंतर 1 बाद 31 धावा आहे. सध्या शेफाली वर्मा आणि जेमिमाह रॉड्रिग्स क्रीजवर आहेत. शेफाली वर्मा 19 चेंडूत 11 धावा करून क्रीजवर आहे. त्याचवेळी जेमिमाह रॉड्रिग्जने 7 चेंडूत 7 धावा केल्या आहेत.
स्मृती मानधना 7 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली.
महिला T20 विश्वचषक 2024 च्या गट सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 106 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, 18 धावांवर स्मृती मानधनाच्या रूपाने भारताला पहिला धक्का बसला. मानधना तुबा हसनने वैयक्तिक 7 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आता शफालीला सपोर्ट करण्यासाठी जेमिमा मैदानात फलंदाजीसाठी उतरली आहे.
स्मृती मानधना आणि शफाली वर्मा क्रीजवर
भारताची धावसंख्या 3 षटकांनंतर बिनबाद 14 धावा. सध्या स्मृती मानधना आणि शफाली वर्मा क्रीजवर आहेत. स्मृती मानधनाने 11 चेंडूत 6 धावा केल्या आहेत. तर शफाली वर्माने 7 चेंडूत 5 धावा केल्या.
पाकिस्तानसमोर 106 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने पहिल्याच षटकात कोणतेही नुकसान न करता 4 धावा केल्या आहेत. शफाली वर्मा आणि स्मृती मानधना प्रत्येकी 2 धावांसह खेळत आहेत. या षटकात शफाली वर्माला एक जीवनदान मिलाले
पाकिस्तानने भारताला 106 धावांचे लक्ष्य दिले
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानने 20 षटकांत 8 गडी गमावून 105 धावा केल्या. अशा प्रकारे भारतासमोर 106 धावांचे लक्ष्य आहे. पाकिस्तानकडून निदा दारने 34 चेंडूत सर्वाधिक 28 धावा केल्या. सलामीवीर मुनिबा अलीने 26 चेंडूत 17 धावांचे योगदान दिले. तर फातिमा सनाने 8 चेंडूत 13 धावा केल्या. त्याचबरोबर भारताकडून अरुंधती रेड्डीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. श्रेयंका पाटीलने 2 विकेट्स घेतल्या. रेणुका सिंग ठाकूर, दीप्ती शर्मा आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
पाकिस्तानला सातवा धक्का बसला
पाकिस्तानला सातवा धक्का बसला आहे. श्रेयंका पाटीलने तुबा हसनला बाद केले आहे. आता पाकिस्तानची धावसंख्या 15 षटकांनंतर 7 गडी बाद 72 धावा आहे.
आशा शोभनाने फातिमा सनाला बाद केले
फातिमा सना जावेद पॅव्हेलियनमध्ये परतली आहे. अशाप्रकारे पाकिस्तानला सहावा धक्का बसला आहे. आता पाकिस्तानची धावसंख्या 14 षटकांनंतर 6 गडी बाद 70 धावा आहे.
52 च्या स्कोअरवर पाकिस्तानने गमावली 5वी विकेट
अरुंधती रेड्डीला एलबीडब्ल्यू आऊट करून पॅव्हेलियनमध्ये पाठवलेल्या आलिया रियाझच्या 52 धावांवर पाकिस्तान महिला संघाने चौथी विकेट गमावली. या सामन्यात आलिया 4 धावा करून बाद झाली.
श्रेयंका पाटीलने मुनिबा अलीला बाद केले
पाकिस्तानला चौथा धक्का बसला आहे. श्रेयंका पाटीलने मुनिबा अलीला बाद केले. मुनिबा अलीने 26 चेंडूत 17 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 2 चौकार मारले. आता पाकिस्तानची धावसंख्या 10 षटकांत 4 बाद 41 धावा आहे.
https://twitter.com/InningsDeepDive/status/1842880230224220205
दीप्ती शर्माने सिद्रा अमीनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले
दीप्ती शर्माने पाकिस्तानची फलंदाज सिद्रा अमीनला 8 धावांवर बोल्ड केले. 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर पाकिस्तानने 2 गडी गमावून 25 धावा केल्या आहेत. मुनिबा अली 11 तर ओमामा सोहेलने अद्याप तिचे खाते उघडलेले नाही.
https://twitter.com/RS_official2610/status/1842875175391416693
रेणुका सिंगच्या षटकात 12 धावा झाल्या
पाकिस्तानची धावसंख्या 3 षटकांनंतर 1 गडी बाद 17 धावा. रेणुका सिंग ठाकूरने तिसऱ्या षटकात 12 धावा दिल्या. सध्या मुनिबा अली 11 चेंडूत 11 धावा करून क्रीजवर आहे. तर, सिद्रा अमीनने 3 चेंडूत 3 धावा केल्या आहेत.
पाकिस्तानला पहिला धक्का बसला
पाकिस्तानला पहिला धक्का बसला आहे. रेणुका सिंग ठाकूरने गुल फिरोजाला बाद केले. गुल फिरोजा 4 चेंडूत एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतली. पहिल्या षटकानंतर पाकिस्तानची धावसंख्या 1 गडी बाद 1 धाव आहे.
https://twitter.com/theRaviYadav001/status/1842869401504174107
भारताविरुद्ध पाकिस्तानच्या डावाची सुरुवात झाली असून मनिबा अली आणि गुल फिरोझा डावाची सलामी देण्यासाठी आल्या आहेत. रेणुका सिंग भारतासाठी गोलंदाजीची सलामी देण्यासाठी आली आहे.
https://twitter.com/theRaviYadav001/status/1842869401504174107
भारतीय महिला संघ (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, एस सजना, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग.
https://twitter.com/BCCIWomen/status/1842861843854873073
पाकिस्तान महिला संघ (प्लेइंग इलेव्हन): मुनिबा अली (यष्टीरक्षक), गुल फिरोज, सिद्रा अमीन, निदा दार, आलिया रियाझ, ओमामा सोहेल, फातिमा सना (कर्णधार), तुबा हसन, नशरा संधू, सय्यदा अरुब शाह, सादिया इक्बाल.
या मोठ्या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातील खेळपट्टीचा अहवाल
महिला T20 विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीवर एक नजर टाकल्यास, येथील खेळपट्टी अतिशय संथ आहे आणि फलंदाजांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत या मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये अत्यंत कमी धावा झाल्या आहेत. न्यूझीलंडने टीम इंडियाविरुद्ध १६० धावा केल्या होत्या. अशा स्थितीत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात लो स्कोअरिंग सामना होऊ शकतो. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणे हा एक चांगला पर्याय असेल कारण त्यामुळे पाठलाग करणाऱ्या संघांना परिस्थितीचे मूल्यांकन करण्याची संधी मिळेल.
दुसऱ्या सामन्यात बदल होऊ शकतात
भारतीय संघ 6ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध दुसरा सामना खेळणार आहे. सेमीफायनलच्या दृष्टिकोनातून हा सामना जिंकणे भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत हरमनप्रीत एका गोलंदाजाला काढून तिच्या जागी फलंदाजाचा समावेश करू शकते. अशा स्थितीत श्रेयंका पाटीलच्या जागी यास्तिका भाटियाला संधी मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यात पाटीलची कामगिरी काही विशेष झाली नाही. तिला एकही विकेट घेता आली नाही. भाटिया महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करते, तर श्रेयंका पाटील आरसीबीचे प्रतिनिधित्व करते.
पाकिस्तानविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा
मिताली राज ही भारताकडून पाकिस्तानविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. तिच्या कारकिर्दीत तिने पाकिस्तानविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 10 सामने खेळून 315 धावा केल्या आहेत. येथे तिची सरासरी 45 च्या आसपास आहे आणि त्याने 88.23 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारत: शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रोनुका ठाकूर सिंग.
पाकिस्तान: मुनिबा अली (यष्टीरक्षक), गुल फिरोज, सिद्रा अमीन, निदा दार, आलिया रियाझ, ओमामा सोहेल, फातिमा सना (कर्णधार), तुबा हसन, नशरा संधू, डायना बेग, सादिया इक्बाल.
भारत आणि पाकिस्तान टी-२० मध्ये आतापर्यंत एकूण १५ वेळा भिडले आहेत, ज्यामध्ये कट्टर प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध भारताचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. भारताने पाकिस्तानला १३ वेळा पराभूत केले आहे, तर पाकिस्तानने भारताला दोन वेळा पराभूत केले आहे.
https://twitter.com/VikashTiwari980/status/1842808442622243312