India vs Pakistan ICC Women’s T20 World Cup 2024 Live Match Updates : आज महिला टी-२० विश्वचषक २०२४ चा सर्वात मोठा आणि महत्वाचा सामना भारत आणि पाकिस्तान संघात होणार आहे. हा सामना दोन्ही संघांत दुंबई येथे होत आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आज भारताला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी इतर पुढच्या सामन्यातही भारताला चांगली कामगिरी करण्याची गरज आहे.

Live Updates

IND-W vs PAK-W Live score, ICC Women’s T20 World Cup 2024 October 06, 2024 : भारत आणि पाकिस्तान टी-२० मध्ये आतापर्यंत एकूण १५ वेळा भिडले आहेत, ज्यामध्ये भारताने १३ आणि पाकिस्तानने २ सामने जिंकले आहेत.

15:41 (IST) 6 Oct 2024
India vs Pakistan Live Score : भारताने पाकिस्तानला दिला पहिला धक्का

पाकिस्तानला पहिला धक्का बसला

पाकिस्तानला पहिला धक्का बसला आहे. रेणुका सिंग ठाकूरने गुल फिरोजाला बाद केले. गुल फिरोजा 4 चेंडूत एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतली. पहिल्या षटकानंतर पाकिस्तानची धावसंख्या 1 गडी बाद 1 धाव आहे.

https://twitter.com/theRaviYadav001/status/1842869401504174107

15:38 (IST) 6 Oct 2024
IND-W vs PAK-W Live score : मुनिबा अली आणि गुल फिरोझाकडून पाकिस्तानच्या डावाला सुरुवात

भारताविरुद्ध पाकिस्तानच्या डावाची सुरुवात झाली असून मनिबा अली आणि गुल फिरोझा डावाची सलामी देण्यासाठी आल्या आहेत. रेणुका सिंग भारतासाठी गोलंदाजीची सलामी देण्यासाठी आली आहे.

https://twitter.com/theRaviYadav001/status/1842869401504174107

15:12 (IST) 6 Oct 2024
IND vs PAK : पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारतीय महिला संघ (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, एस सजना, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग.

पाकिस्तान महिला संघ (प्लेइंग इलेव्हन): मुनिबा अली (यष्टीरक्षक), गुल फिरोज, सिद्रा अमीन, निदा दार, आलिया रियाझ, ओमामा सोहेल, फातिमा सना (कर्णधार), तुबा हसन, नशरा संधू, सय्यदा अरुब शाह, सादिया इक्बाल.

15:08 (IST) 6 Oct 2024
India vs Pakistan Women’s T20 World Cup 2024 Live : पाकिस्तानने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय

या मोठ्या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

https://twitter.com/BCCIWomen/status/1842861402597261581

15:01 (IST) 6 Oct 2024
IND-W vs PAK-W Live : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातील खेळपट्टीचा अहवाल

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातील खेळपट्टीचा अहवाल

महिला T20 विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीवर एक नजर टाकल्यास, येथील खेळपट्टी अतिशय संथ आहे आणि फलंदाजांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत या मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये अत्यंत कमी धावा झाल्या आहेत. न्यूझीलंडने टीम इंडियाविरुद्ध १६० धावा केल्या होत्या. अशा स्थितीत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात लो स्कोअरिंग सामना होऊ शकतो. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणे हा एक चांगला पर्याय असेल कारण त्यामुळे पाठलाग करणाऱ्या संघांना परिस्थितीचे मूल्यांकन करण्याची संधी मिळेल.

14:31 (IST) 6 Oct 2024
India vs Pakistan Live Score : दुसऱ्या सामन्यात बदल होऊ शकतात

दुसऱ्या सामन्यात बदल होऊ शकतात

भारतीय संघ 6ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध दुसरा सामना खेळणार आहे. सेमीफायनलच्या दृष्टिकोनातून हा सामना जिंकणे भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत हरमनप्रीत एका गोलंदाजाला काढून तिच्या जागी फलंदाजाचा समावेश करू शकते. अशा स्थितीत श्रेयंका पाटीलच्या जागी यास्तिका भाटियाला संधी मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यात पाटीलची कामगिरी काही विशेष झाली नाही. तिला एकही विकेट घेता आली नाही. भाटिया महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करते, तर श्रेयंका पाटील आरसीबीचे प्रतिनिधित्व करते.

14:09 (IST) 6 Oct 2024
India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा

पाकिस्तानविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा

मिताली राज ही भारताकडून पाकिस्तानविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. तिच्या कारकिर्दीत तिने पाकिस्तानविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 10 सामने खेळून 315 धावा केल्या आहेत. येथे तिची सरासरी 45 च्या आसपास आहे आणि त्याने 88.23 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

13:50 (IST) 6 Oct 2024
IND-W vs PAK-W Live score : आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत: शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रोनुका ठाकूर सिंग.

पाकिस्तान: मुनिबा अली (यष्टीरक्षक), गुल फिरोज, सिद्रा अमीन, निदा दार, आलिया रियाझ, ओमामा सोहेल, फातिमा सना (कर्णधार), तुबा हसन, नशरा संधू, डायना बेग, सादिया इक्बाल.

13:42 (IST) 6 Oct 2024
IND vs PAK : भारताचा पाकिस्तानविरुद्ध रेकॉर्ड कसा आहे?

भारत आणि पाकिस्तान टी-२० मध्ये आतापर्यंत एकूण १५ वेळा भिडले आहेत, ज्यामध्ये कट्टर प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध भारताचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. भारताने पाकिस्तानला १३ वेळा पराभूत केले आहे, तर पाकिस्तानने भारताला दोन वेळा पराभूत केले आहे.

IND-W vs PAK-W Live score, ICC Women’s T20 World Cup 2024 October 06, 2024 : महिला टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेतील सातवा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत.