India vs Sri Lanka ICC Women’s T20 World Cup 2024 Live Match Updates: टी-२० विश्वचषक २०२४ मधील भारत आज आपला तिसरा गट सामना श्रीलंकेविरूद्ध खेळणार आहे. आशिया चॅम्पियन श्रीलंकेचा संघ भारताला तगडी टक्कर देण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आतापर्यंत एक सामना जिंकला आहे आणि एक पराभव पत्करावा लागला आहे. गेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला होता. या विजयानंतरही भारताचा नेट रन रेट (-1.217) आहे. बुधवारी श्रीलंकेला पराभूत करून भारताला केवळ नेट रन रेट सुधारायचा नाही तर दोन गुण घेऊन टॉप-२ गाठण्याचाही त्यांचा प्रयत्न असेल. भारत सध्या अ गटात २ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. श्रीलंका पाचव्या स्थानावर आहे. त्यांनी या स्पर्धेत एकही विजय नोंदवला नाही.

Live Updates

India Women vs Sri Lanka Women Live Score Update: भारत वि श्रीलंका टी-20 विश्वचषक 2024 सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

19:42 (IST) 9 Oct 2024
INDW vs SLW Live Score: शफाली वर्माचा चौकार

शफाली वर्माने तिसऱ्या षटकात पहिला चौकार लगावत आक्रमक खेळी दाखवण्याचा प्रयत्न केला. स्मृतीनेही काही उचलून मोठे फटके खेळले पण चेंडू सीमारेषेपलीकडे पोहोचवू शकली नाही. अशारितीने तीन षटकांत भारताने बिनबाद १८ धावा केल्या आहेत.

19:33 (IST) 9 Oct 2024
INDW vs SLW Live Score: भारताच्या डावाला सुरूवात

भारत वि श्रीलंका सामन्याला सुरूवात झाली असून भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. भारताकडून शफाली वर्मा आणि स्मृती मानधना ही जोडी मैदानात आहे. तर श्रीलंकेकडून इनोशी प्रियादर्शनीने गोलंदाजीला सुरूवात केली आहे. पहिल्या षटकानंतर भारत बिनबाद ५ धावांवर खेळत आहे.

19:10 (IST) 9 Oct 2024
INDW vs SLW Live Score: श्रीलंकेची प्लेईंग इलेव्हन

विश्मी गुणरत्ने, चामारी अथापथु (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (यष्टीरक्षक), अमा कांचना, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी, उदेशिका प्रबोधनी, इनोशी रणाविरा

19:07 (IST) 9 Oct 2024
INDW vs SLW Live Score: भारताची प्लेईंग इलेव्हन

शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, सजीवन सजना, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग

https://twitter.com/BCCIWomen/status/1844009826575368700

19:04 (IST) 9 Oct 2024
INDW vs SLW Live Score: नाणेफेक

भारत वि श्रीलंका सामन्याची नाणेफेक भारताने जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याची निर्णय घेतला आहे. तर श्रीलंकेचा संघ गोलंदाजीने सामन्याला सुरूवात करणार आहे. भारतीय संघाने प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

19:00 (IST) 9 Oct 2024
INDW vs SLW Live Score: काहीच वेळात होणार नाणेफेक

भारत वि श्रीलंका सामन्याची काहीच वेळात नाणेफेक होणार आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि श्रीलंकेची कर्णधार चमारी अट्टापट्टू मैदानात असणार आहेत.

18:17 (IST) 9 Oct 2024
INDW vs SLW Live Score: हरमनप्रीत कौर फिट आहे की नाही?

भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिने कर्णधार हरमनप्रीत हिच्या दुखापतीवर अपडेट दिले. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर श्रीलंका सामन्यासाठी फिट असून ती खेळताना दिसणार आहे. पाकिस्तानविरुद्ध मानेच्या दुखापतीमुळे ती 'रिटायर्ड हर्ट' झाली होती. मात्र, पूजा वस्त्राकरच्या फिटनेसबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. ती पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळलेला नाही.

17:53 (IST) 9 Oct 2024
INDW vs SLW Live Score: भारतीय संघाला मोठा विजय आवश्यक

आजचा श्रीलंकेविरूद्धचा सामना जिंकणे भारतीय संघासाठी महत्त्वाचे आहे. भारताच्या नेट रन नेटमध्येही सुधारणा व्हावी म्हणून विजय मोठ्या फरकाने मिळवणं, हेही महत्त्वाचे आहे.

17:52 (IST) 9 Oct 2024
INDW vs SLW Live Score: भारतीय संघ

भारतीय संघाला पहिल्या दोन सामन्यात एक पराभव तर एका सामन्यात विजय मिळवला आहे. न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाला आणि पाकिस्तानला पराभूत केले आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आपल्या गटात दोन गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

17:37 (IST) 9 Oct 2024
INDW vs SLW Live Score: हेड टू हेड रेकॉर्ड

भारत आणि श्रीलंका महिला संघाच्या टी-२० हेड टू हेड रेकॉर्डमध्ये भारतीय संघ वरचढ आहे. दोन्ही संघांमध्ये एकूण २५ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये भारताचा रेकॉर्ड उत्कृष्ट होता. भारताने १९ सामने जिंकले तर श्रीलंकेने ५ सामने जिंकले. एक सामना अनिर्णित राहिला. तर महिला टी-२० विश्वचषकात दोन्ही संघ आतापर्यंत पाच वेळा आमनेसामने आले आहेत. भारताने चार सामने जिंकले तर श्रीलंकेने एक सामना जिंकला आहे.

17:35 (IST) 9 Oct 2024
INDW vs SLW Live Score: भारत वि श्रीलंका

महिला टी-२० विश्वचषक २०२४ मधील १२वा सामना आज भारत वि श्रीलंका या संघांमध्ये दुबईत खेळवला जाणार आहे. भारताची नजर मोठ्या विजयावर असेल तर श्रीलंकेचा संघ पहिला विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल.

IND-W vs SL-W Live score, ICC Women's T20 World Cup 2024 October 09, 2024: भारत वि श्रीलंका यांच्यातील टी-२० वर्ल्डकप २०२४३ मधील सामना आज खेळवला जात आहे. भारताला उपांत्य फेरी गाठायची असेल तर मोठा विजय नोंदवण्याची आवश्यकता आहे.