India vs Sri Lanka ICC Women’s T20 World Cup 2024 Highlights: टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारताने श्रीलंकेचा ८२ धावांनी मोठा पराभव करत टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. भारताने श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई करत १७३ धावांचे मोठे लक्ष्य दिले आणि त्यानंतर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही उत्कृष्ट कामगिरी करत आवश्यक अशा या मोठ्या विजयाची नोंद केली. भारताला टी-२० विश्वचषक २०२४ च्या उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहायचे असेल तर त्यांना एका मोठ्या विजयाची गरज होती आणि भारताने श्रीलंकेविरूद्ध हा मोठा विजय नोंदवला आहे. या विजयासह भारताने अ गटातील गुणतालिकेत न्यूझीलंडला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
India Women vs Sri Lanka Women Live Score Update: भारत वि श्रीलंका टी-20 विश्वचषक 2024 सामन्याचे लाईव्ह अपडेट्स
दीप्ती शर्माच्या अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर स्मृती मानधनाने प्रबोधिनीचा शानदार झेल टिपत श्रीलंकेला ९० धावांवर ऑल आऊट केले. यासह भारताने श्रीलंकेवर ८२ धावांनी मोठा विजय नोंदवला आहे.
अरूंधती रेड्डीने १९व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर कांचनाला झेलबाद केले. हरमनप्रीतच्या जागी बदली खेळाडू म्हणून आलेल्या राधाने या सामन्यात एकापेक्षा एक जबरदस्त झेल टिपले आहेत. यासह भारत विजयापासून १ विकेट दूर आहे.
आशा शोभनाने १५व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर राधा यादवे प्रियदर्शनीला सीमारेषेजवळ झेलबाद केले. अशारितीने आशाने ३ विकेट्स घेतले आहेत. तर भारताला विजयासाठी २ विकेट्सची आवश्यकता आहे. भारताने जर हा मोठा विजय नोंदवला तर भारत गुणतालिकेत न्यूझीलंडला मागे टाकू शकतो.
१३व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर आशा शोभनाने भारताला अजून एक विकेट मिळवून दिली आहे. आशा शोभनाच्या गुगलीवर सुगंधिका कुमारीला रिचा घोष कमाल झेल टिपत बाद केले. श्रीलंकेने रिव्ह्यू घेतला पण निकाल भारताच्या बाजूने गेला. यासह श्रीलंकेने १३ षटकांत ७ बाद ६१ धावा केल्या आहेत.
अरूंधती रेड्डीच्या १२व्या षटकात श्रीलंकेने २ विकेट्स गमावले आहेत. अरूंधतीने दुसऱ्या चेंडूवर निलाक्षीला शफाली वर्मीकरवी झेलबाद केले. तर अखेरच्या चेंडूवर रेणुकाने उत्कृष्ट झेल घेत दिल्हारीला झेलबाद केले. यासह श्रीलंकेला विजयासाठी ४८ चेंडूत ११५ धावांची गरज आहे.
आशा शोभनाने आठव्या षटकात विकेटच्या अनेक संधी निर्माण केल्या आणि अखेरीस शेवटच्या चेंडूवर तिला यश मिळाले. आशा गोलंदाजी करत फलंदाजाला पुढे येऊन खेळण्यासाठी प्रवृत्त केले पण अनुष्का संजीवनी चेंडू टाईम करू शकली नाही आणि तो थेट रिचाच्या ग्लोव्हजमध्ये गेला आणि रिचाने चपळाईने अनुष्काला स्टंपिंग करत बाद केले. श्रीलंकाने ८ षटकांत ४ बाद ३४ धावा केल्या आहेत.
पॉवरप्लेमध्ये श्रीलंकेने ३ बाद २४ धावा केल्या आहेत. भारताने पहिल्या सलग ३ षटकांत ३ विकेट घेत श्रीलंकेला मोठे ३ धक्के दिले. गुणरत्ने, कर्णधार चमारी आणि हर्षिता माधवी बाद झाले आहेत. ज्यात रेणुका सिंगने २ तर श्रेयंका पाटीलने २ विकेट घेतली आहे.
रेणुका सिंगने तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर हर्षिता माधवीला रिचा घोषकरवी झेलबाद करत सलग तिसऱ्या षटकात तिसरी विकेट घेतली आहे. यासह श्रीलंकेने ३ षटकात ३ बाद ६ धावा केल्या आहेत.
भारताला दुसऱ्याच षटकात मोठी विकेट मिळाली आहे. श्रेयंका पाटीलने दुसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर श्रीलंकेची कर्णधार चमारीला बाद करत भारताच्या खात्यात मोठी विकेट मिळवून दिली आहे. श्रीलंकेसाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. चमारी फक्त १ धाव करून बाद झाली.
रेणुका सिंगच्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर गुणरत्ने मोठा फटका खेळायला गेली आणि राधा यादवने तिला झेलबाद केले आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या जागी मैदानात आलेल्या राधा यादवन उत्कृष्ट झेल टिपत भारताला ०-१ विकेट मिळवून दिली.
भारताने दिलेल्या १७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी श्रीलंकेकडून गुणरत्ने आणि चमारी आल्या आहेत. तर भारताकडून रेणुका सिंगने गोलंदाजीला सुरूवात केली आहे.
पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात रिटायर्ड हर्ट झालेल्या भारताच्या कर्णधाराने श्रीलंकेविरूद्ध सामन्यात आपली आक्रमक खेळी दाखवून दिली. सुरूवातीपासूनच हल्ला बोल फलंदाजी करत तिने श्रीलंकेच्या गोलंदाजांची शाळा घेतली. हरमनने अवघ्या २७ चेंडूत १ षटकार आणि ८ चौकारांसह ५२ धावा केल्या आहेत.
Captain Harmanpreet Kaur finishes the innings in style with a four ?
— BCCI Women (@BCCIWomen) October 9, 2024
She completes her half-century as well! ??
A fine knock that from the skipper! ??
?: ICC
Scorecard ▶️ https://t.co/4CwKjmWL30#TeamIndia | #T20WorldCup | #INDvSL | #WomenInBlue pic.twitter.com/8VEpFfP5eX
स्मृती मानधना-शफाली वर्माची भागीदारी, स्मृतीचे शानदार अर्धशतक आणि हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने यंदाच्या वर्ल्डकपमधील सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. भारताने ३ बाद १७२ धावा करत सर्वांनाच मागे टाकलं आहे. यामध्ये हरमनप्रीत कौरने अवघ्या २७ चेंडूत ५७ धावा करत श्रीलंकेच्या गोलंदाजांना बॅकफूटवर टाकले.
हरमनप्रीत कौरने अखेरच्या षटकांमध्ये 2-2 चौकार लगावत आपला आक्रमक अंदाज दाखवून दिला आहे. हरमनने १९ षटकांत भारताला ३ बाद १५८ धावांचा टप्पा गाठून दिला आहे. हरमनने २३ चेंडूत झटपट ४१ धावा केल्या आहेत.
हरमनप्रीत आणि जेमिमा भारताच्या फलंदाजीचा रोख बदलला आणि मोठे फटके खेळले. एकदा जीवदान मिळाल्यानंतर जेमिमा पुढच्या वेळेस मात्र झेलबाद झाली. हरमनप्रीत आणि जेमिमा भारताच्या फलंदाजीचा रोख बदलला आणि मोठे फटके खेळले. एकदा जीवदान मिळाल्यानंतर जेमिमा पुढच्या वेळेस मात्र झेलबाद झाली. १७व्या षटकातील कांचनाच्या दुसऱ्या चेंडूवर जेमिमा मोठा फटका खेळण्याच्या नागात प्रबोधिनीकडून झेलबाद झाली.
हरमनप्रीत जेमिमा रोड्रिग्जने १७व्या षटकात १३ धावा कुटल्या तर हरमनप्रीतने अखेरच्या चेंडूवर षटकार लगावला. यासह भारताने १६ षटकांत २ बाद १२६ धावा केल्या आहेत.
भारताच्या दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमाने भारताचा डाव सावरला आहे. यासह भारताने २ बाद ११३ धावा केल्या आहेत.
स्मृती मानधनानंतर कर्णधार चमारीच्या १३व्या षटकातील पाचव्या चेंडूवर शफाली वर्मा मोठा फटका खेळण्याच्या नादात झेलबाद झाली. शफालीने बाद होण्यापूर्वी ४० चेंडूत ४ चौकारांसह ४३ धावा केल्या. अशारितीने भारताने एका षटकात दोन्ही सलामीवीरांना गमावले. भारताने १३ षटकांत २ बाद ९८ धावा केल्या आहेत.
शतकानंतर दुसऱ्या चेंडूवर धाव घेण्याच्या नादात स्मृती मानधना धावबाद झाली आहे. बाद होण्यापूर्वी स्मृतीने ३८ चेंडूत एक षटकार आणि ४ चौकारांसह ५० धावा केल्या.
Unfortunate dismissal for Smiti at 50!
— The Khel India (@TheKhelIndia) October 9, 2024
Shafali Verma also departs on 43(40)
Back to back wickets fall for India ?? pic.twitter.com/21fOLVUlW2
सावधतेसह आक्रमक फलंदाजी करत उपकर्णधार स्मृती मानधनाने शानदार अर्धशतक झळकावले आहे. स्मृतीने ३७ चेंडूत १ षटकार आणि ६ चौकारांसह ५० धावा पूर्ण केल्या.
शफाली वर्मा आणि स्मृती मानधनाने आक्रमक फलंदाजी कायम ठेवत १२ षटकांत नाबाद ९७ धावा केल्या आहेत. स्मृती मानधना अर्धशतकाच्या जवळ आहे.
भारताच्या सलामीवीरांना अखेरीस टी-२० विश्वचषकात सूर गवसला आहे. शफाली वर्मा आणि स्मृती मानधनाने आक्रमक फलंदाजी करत १० षटकांत ७८ धावा केल्या आहेत. स्मृती मानधना ४२ धावा तर शफाली वर्मी ३५ धावांवर खेळत आहे. भारताला उर्वरित १० षटकांत मोठी धावसंख्या धावफलकावर लावावी लागणार आहे.
स्मृती मानधनाने सातव्या षटकात षटकार लगावत भारताकडून यंदाच्या टी-२० विश्वचषकातील पहिला षटकार लगावला आहे. यासह भारताने ७ षटकांत बिनबाद ५१ धावा केल्या आहेत.
शफाली वर्मा आणि स्मृती मानधनाने पॉवरप्लेमध्ये बिनबाद ४१ धावा केल्या आहेत. यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमधील भारताची एकही विकेट न गमावता चांगली पॉवरप्ले धावसंख्या आहे. स्मृती-शफालीकडून मोठ्या खेळीची सर्वांना अपेक्षा आहे.
भारताच्या सलामीवीर शफाली वर्मा आणि स्मृती मानधना आक्रमक खेळी करताना दिसत आहे. दोघींनीही मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. पाच षटकांत भारताने बिनबाद ३० धावा केल्या आहेत.
शफाली वर्माने तिसऱ्या षटकात पहिला चौकार लगावत आक्रमक खेळी दाखवण्याचा प्रयत्न केला. स्मृतीनेही काही उचलून मोठे फटके खेळले पण चेंडू सीमारेषेपलीकडे पोहोचवू शकली नाही. अशारितीने तीन षटकांत भारताने बिनबाद १८ धावा केल्या आहेत.
भारत वि श्रीलंका सामन्याला सुरूवात झाली असून भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. भारताकडून शफाली वर्मा आणि स्मृती मानधना ही जोडी मैदानात आहे. तर श्रीलंकेकडून इनोशी प्रियादर्शनीने गोलंदाजीला सुरूवात केली आहे. पहिल्या षटकानंतर भारत बिनबाद ५ धावांवर खेळत आहे.
विश्मी गुणरत्ने, चामारी अथापथु (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (यष्टीरक्षक), अमा कांचना, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी, उदेशिका प्रबोधनी, इनोशी रणाविरा
शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, सजीवन सजना, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग
? Team Update ?#TeamIndia remain unchanged for their match against Sri Lanka
— BCCI Women (@BCCIWomen) October 9, 2024
Here's a look at our Playing XI ??
Follow the match ▶️ https://t.co/4CwKjmWL30#T20WorldCup | #INDvSL | #WomenInBlue pic.twitter.com/CbH7L7Xvyb
भारत वि श्रीलंका सामन्याची नाणेफेक भारताने जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याची निर्णय घेतला आहे. तर श्रीलंकेचा संघ गोलंदाजीने सामन्याला सुरूवात करणार आहे. भारतीय संघाने प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.