India vs Sri Lanka ICC Women’s T20 World Cup 2024 Highlights: टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारताने श्रीलंकेचा ८२ धावांनी मोठा पराभव करत टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. भारताने श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई करत १७३ धावांचे मोठे लक्ष्य दिले आणि त्यानंतर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही उत्कृष्ट कामगिरी करत आवश्यक अशा या मोठ्या विजयाची नोंद केली. भारताला टी-२० विश्वचषक २०२४ च्या उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहायचे असेल तर त्यांना एका मोठ्या विजयाची गरज होती आणि भारताने श्रीलंकेविरूद्ध हा मोठा विजय नोंदवला आहे. या विजयासह भारताने अ गटातील गुणतालिकेत न्यूझीलंडला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे.
India Women vs Sri Lanka Women Live Score Update: भारत वि श्रीलंका टी-20 विश्वचषक 2024 सामन्याचे लाईव्ह अपडेट्स
भारत वि श्रीलंका सामन्याची काहीच वेळात नाणेफेक होणार आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि श्रीलंकेची कर्णधार चमारी अट्टापट्टू मैदानात असणार आहेत.
भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिने कर्णधार हरमनप्रीत हिच्या दुखापतीवर अपडेट दिले. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर श्रीलंका सामन्यासाठी फिट असून ती खेळताना दिसणार आहे. पाकिस्तानविरुद्ध मानेच्या दुखापतीमुळे ती ‘रिटायर्ड हर्ट’ झाली होती. मात्र, पूजा वस्त्राकरच्या फिटनेसबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. ती पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळलेला नाही.
आजचा श्रीलंकेविरूद्धचा सामना जिंकणे भारतीय संघासाठी महत्त्वाचे आहे. भारताच्या नेट रन नेटमध्येही सुधारणा व्हावी म्हणून विजय मोठ्या फरकाने मिळवणं, हेही महत्त्वाचे आहे.
भारतीय संघाला पहिल्या दोन सामन्यात एक पराभव तर एका सामन्यात विजय मिळवला आहे. न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाला आणि पाकिस्तानला पराभूत केले आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आपल्या गटात दोन गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
भारत आणि श्रीलंका महिला संघाच्या टी-२० हेड टू हेड रेकॉर्डमध्ये भारतीय संघ वरचढ आहे. दोन्ही संघांमध्ये एकूण २५ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये भारताचा रेकॉर्ड उत्कृष्ट होता. भारताने १९ सामने जिंकले तर श्रीलंकेने ५ सामने जिंकले. एक सामना अनिर्णित राहिला. तर महिला टी-२० विश्वचषकात दोन्ही संघ आतापर्यंत पाच वेळा आमनेसामने आले आहेत. भारताने चार सामने जिंकले तर श्रीलंकेने एक सामना जिंकला आहे.
महिला टी-२० विश्वचषक २०२४ मधील १२वा सामना आज भारत वि श्रीलंका या संघांमध्ये दुबईत खेळवला जाणार आहे. भारताची नजर मोठ्या विजयावर असेल तर श्रीलंकेचा संघ पहिला विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल.