बडोदा : भारतीय महिला संघाचे लक्ष्य वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या शुक्रवारी होणाऱ्या तिसऱ्या व अखेरच्या एकदिवसीय सामन्यात विजय नोंदवत मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याचे असेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन एकदिवसीय सामन्यांत पराभूत झाल्यानंतर विंडीजविरुद्ध भारताने विजयी पुनरागमन केेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात नेमकं काय घडलं? उस्मान ख्वाजाने सांगितला प्रसंग

भारतीय संघाने मालिकेत ३००हून अधिक धावा केल्या आहेत. पहिल्या सामन्यात स्मृती मनधानासह डावाची सुरुवात करणाऱ्या पत्रिका रावलने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चमकदार कामगिरी केली. हरलीन देओलने दुसऱ्या लढतीत तिसऱ्या क्रमांकावर शतक झळकावले. अखेरच्या सामन्यातही हीच लय कायम राखण्याचा तिचा प्रयत्न असेल. पूर्ण तंदुरुस्त झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरचाही आत्मविश्वास दुणावला आहे. मात्र, तिला अजूनही मोठी खेळी करता आलेली आहे. भारताने यापूर्वीच मालिका जिंकल्याने हरमनप्रीतकडे अखेरच्या सामन्यात आक्रमक खेळ करण्याची संधी आहे.

वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूरने गोलंदाजीत संघाचे नेतृत्व केले आहे. युवा गोलंदाज टिटास साधूनेही फलंदाजांना बाद केले आहे. लेग स्पिनर प्रिया मिश्राने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. या सामन्यात भारतीय संघाकडून तनुजा कंवर व तेजल हसबनीस यांना अंतिम अकरामध्ये स्थान मिळू शकते. दुसरीकडे, सामन्यात विजय मिळवायचा झाल्यास विंडीजला आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल. त्यांच्याकडून केवळ हेली मॅथ्यूजला चमक दाखवता आली आहे.

वेळ : सकाळी ९.३० वा. थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, जिओ सिनेमा.