India Women’s Team Won Kho Kho World Cup 2025: खो खो विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय महिला संघाने नेपाळचा ७८-४० असा पराभव करून प्रथमच विश्वविजेतेपद पटकावले आहे. सुरुवातीपासूनच भारताच्या लेकींनी दमदार कामगिरी दाखवत कोणत्याही संघाला पुनरागमनाची संधी दिली नाही. अंतिम सामन्यातही नेपाळने भारतासमोर पूर्णपणे गुडघे टेकले आणि भारताने बाजी मारली. प्रियांका इंगळेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने या सामन्यात इतिहास रचला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खो-खो विश्वचषक पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला आणि भारताने प्रथमच हे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी अप्रतिम खेळ दाखवत नेपाळचा दमदार पराभव केला. पहिल्याच टर्नपासून भारतीय महिला खेळाडूंनी सामन्यावर वर्चस्व राखण्यास सुरुवात केली.

हेही वाचा – Wankhede Stadium 50th Anniversary LIVE: वानखेडेच्या पन्नाशीच्या कार्यक्रमात साजरा केला सुनील गावस्करांचा ७५ वा वाढदिवस

भारतीय महिला संघाने पहिल्या टर्नमध्ये आक्रमण केले आणि नेपाळच्या बचावपटूंना प्रतिकार करता आला नाही, त्यानंतर भारताने ३४-० अशी सुरुवातीची आघाडी घेतली आणि येथून सामना त्यांच्या ताब्यात आला. प्रियंका इंगळेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नेपाळला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. दुसऱ्या टर्नमध्ये नेपाळच्या संघावर आक्रमण करण्याची पाळी आली असताना त्यांना आघाडी मिळवता आली नाही. फक्त अंतर कमी करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. दुसऱ्या टर्ननंतर स्कोअर ३५-२४ असा झाला.

हेही वाचा – INDW vs WIW: भारताच्या लेकींची टी-२० वर्ल्डकपमध्ये दणक्यात सुरूवात, २६ चेंडूतच जिंकला पहिला सामना; वेस्ट इंडिजचा उडवला धुव्वा

दुसऱ्या टर्ननंतर बचावासाठी आलेल्या टीम इंडियाच्या बचावपटूंनी नेपाळच्या हल्लेखोरांच्या नाकावर टिचून मैदानात टिकून राहत शानदार बचाव करत १ गुण मिळवला. भारताने दुसऱ्या टर्नमध्ये बचावातून ड्रीम रनद्वारे १ गुणही मिळवला. तर, नेपाळच्या आक्रमणकर्त्यांनी २२ गुण मिळवले. तिसऱ्या टर्नमध्ये आक्रमण करत भारताच्या लेकींनी पुन्हा चमत्कार केला आणि नेपाळला सामन्यातून पूर्णपणे बाहेर केले आणि ३८ गुण मिळवले. त्याचवेळी नेपाळने बचावात एकही गुण मिळवला नाही.

हेही वाचा – Manu Bhaker: मनू भाकेरच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर, आजी आणि मामाचा रस्ते अपघातात मृत्यू

चौथ्या टर्नमध्ये भारतीय महिला संघाने नेपाळच्या आक्रमणकर्त्यांना फारसे वर्चस्व गाजवू दिले नाही आणि बचाव करताना जबरदस्त खेळ दाखवला. या बदल्यात भारतीय महिला खेळाडूंनी नेपाळ संघाला सामन्यातून पूर्णपणे बाहेर केले. शेवटी सामना ७८-४० अशा गुणांवर संपला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India women win inaugural kho kho world cup title with superb win over nepal by 78 40 watch video bdg