भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) विविध कारणास्तव भारतीय महिला क्रिकेट संघासाठीच्या प्रशिक्षक निवडीसाठी नकार दिला, तर भारताचे माजी कर्णधार कपिल देव, अंशुमन गायकवाड हे निवडीची प्रक्रिया पार पाडतील.

रमेश पोवार यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबर रोजी संपुष्टात आल्यानंतर भारतीय महिला संघासाठीचे प्रशिक्षकपद रिक्त झाले आहे. या पदासाठी १५ डिसेंबपर्यंत अर्ज करावयाचे आहेत. मात्र नियमानुसार, सचिन तेंडुलकर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांचा समावेश असलेल्या सीएसीकडे या निवडीचे अधिकार आहेत. ‘‘सचिन, सौरव आणि लक्ष्मण यांना प्रशिक्षक निवडीसाठी आधी विचारणा करण्यात येईल. जर त्यांनी होकार कळवला तर प्रश्नच उद्भवणार नाही,’’ असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

काहींच्या मते, सीएसी या निवडीत लक्ष घालणार नाही. अशा परिस्थितीत बीसीसीआय सुनील गावस्कर, कपिलदेव, अंशुमन गायकवाड, शुभांगी कुलकर्णी आणि शांता रंगास्वामी यांच्या नावाचा विचार करेल. या सर्वाच्या उपलब्धतेनुसार तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात येईल, असेही बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.

Story img Loader