भारताच्या महेश भूपती, सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर खेळताना विजयी सलामी दिली आहे. अनुभवी महेश भूपतीने ऑस्ट्रियन साथीदार ज्युलियन कोन्लेच्या साथीने खेळताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेत दुसऱ्या फेरीत आगेकूच केली. आठव्या मानांकित भूपती-कोन्ले जोडीने बिगर मानांकित अर्जेटिनाच्या लिओनाडरे मेयर आणि स्पेनच्या अल्बटरे रामोस जोडीवर ६-२, ६-७ (५), ६-४, ६-२ असा विजय मिळवला. दुसरा सेट वगळता भूपती-कोन्ले जोडीला ब्रेकपॉइंट्सची संधी मिळाली नाही. पुढच्या फेरीत त्यांचा मुकाबला अमेरिकेच्या निकोलस मोन्रो आणि जर्मनीच्या सिमोन स्टॅडलर जोडीशी होणार आहे. भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा सहकारी रॉजर व्ॉसेलिन यांनी जार्को नोमिनेन आणि दिमित्री तुस्रुनोव्ह यांच्यावर ७-६, २-६, ७-६ असा विजय मिळवला. तर सानिया मिझाने आणि तिची सहकारी ह्य़ुबर यांनी व्होराकोव्हा आणि झोकापालोव्हा यांना
६-३,३-६,६-१ असे पराभूत केले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jun 2013 रोजी प्रकाशित
भारतीयांची विजयी आगेकूच
भारताच्या महेश भूपती, सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर खेळताना विजयी सलामी दिली आहे. अनुभवी महेश भूपतीने ऑस्ट्रियन साथीदार ज्युलियन कोन्लेच्या साथीने खेळताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेत दुसऱ्या फेरीत आगेकूच केली.

First published on: 27-06-2013 at 03:28 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India won their matches in wimbledon