भारताने  पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ४८-३९ असे नमवत सलग चौथ्यांदा कबड्डी विश्वचषक जिंकला. जेतेपदासह भारताने दोन कोटींचा धनादेश मिळवला.
भारत आणि पाकिस्तान यांना पुढील वर्षी होणा-या कबड्डी विश्वचषकाचे संयुक्त यजमानपद देण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल आणि पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे प्रमुख शाहबाझ शरीफ यांनी या निर्णयाचे स्वागत केले. उभय देशांतील जास्तकरून पंजाबच्या सीमेवरील संबंध सुधारण्यासाठी कबड्डीच्या संयुक्त यजमानपदाचा निर्णय चांगला असल्याचे या दोघांनी म्हटले. त्यानुसार कबड्डी विश्वचषकाचे सामने लाहोर आणि लुधियाना येथे होतील.

 

Story img Loader