ईडन गार्डन्सच्या दुसऱ्या थरारानुभवासाठी भारतीय संघातील काही खेळाडूंसह पाकिस्तानचा संपूर्ण संघ येथे सोमवारी दाखल झाला. तीन जानेवारीला दुसरा एकदिवसीय सामना ईडन गार्डन्सवर खेळवण्यात येणार आहे.
भारतीय संघातील खेळाडू वेगळ्या गटांनी येथे दाखल होणार आहेत. सोमवारी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, प्रशिक्षक डंकन फ्लेचर, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि स्थानिक वेगवान गोलंदाज अशोक दिंडा यांचे आगमन झाले. अन्य खेळाडू मंगळवारी दाखल होणार आहेत, तर पाकिस्तानचा संपूर्ण संघ सोमवारीच दाखल झाला आहे, असे बंगाल क्रिकेट असोसिएशनमधील सूत्रांनी सांगितले.
 सोमवारी दोन्ही संघ खाजगी पाटर्य़ामध्ये व्यस्त असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दोन्ही संघ मंगळवारी संध्याकाळी सरावासाठी ईडन गार्डन्सवर दाखल होतील, असे स्थानिक व्यवस्थापकाने प्रसारमाध्यमांना सांगितले. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये पाकिस्तानने १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताला मालिका वाचवण्यासाठी हा सामना जिंकणे अनिवार्य आहे.

Story img Loader