ठाणे महापौर वर्षां मॅरेथॉनमध्ये पुरुषांमध्ये भारतीय सेना दलाच्या धावपटूंनी तर महिलांमध्ये मध्य रेल्वेच्या महिला धावपटूंनी वर्चस्व कायम राखले. २१ किलोमीटरच्या शर्यतीत पुरुष गटामध्ये सेनादलाच्या स्पर्धकांनी सर्वात जलद गतीचा नवा विक्रम प्रस्थापित करत पहिले तीन क्रमांक पटकावले. इलाम सिंगने १ तास ७ मिनिटे ३७ सेकंदांचा नवा विक्रम या स्पर्धेत नोंदवत पुरुषांचे जेतेपद पटकावले, तर महिलांमध्ये मध्य रेल्वेच्या स्वाती गाढवेने ५९ मिनिटे ५३ सेकंदांत स्पर्धा पूर्ण करत प्रथम क्रमांक मिळवला.
मॅरेथॉन शर्यतीचे निकाल
पुरुष २१ किलोमीटर :
१) इलाम सिंग (सेना दल, पुणे  १ तास ७ मिनिटे ३७ से.),
२)अर्जुन प्रधान (सेना दल, पुणे १ तास ७ मिनिटे ४८ से.),
३)आशीष सिंग (सेना दल, पुणे १ तास ७ मिनिटे ४९ से.)
महिला १५ किलोमीटर :
१) स्वाती गाढवे (मध्य रेल्वे, पुणे  ५९ मि. ५३ से.), २) मनीषा साळुखे (मध्य रेल्वे, पुणे १ तास ६ से.), ३) सुप्रिया पाटील (उरण जिमखाना १ तास ३८ से.).

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा