केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून मान्यता काढून घेतली जाईल या भीतीने भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने घटनादुरुस्ती करीत अध्यक्ष, सचिव आदी पदांसाठी २४ फेब्रुवारी रोजी पुन्हा निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी येथे ही माहिती दिली. महासंघाच्या अध्यक्ष, सचिव आदी वरिष्ठ पदासांठी सध्याच्या कार्यकारिणीतील सदस्यालाच उभे राहता येईल हा नियम काढून टाकण्यात आला आहे. येथे झालेल्या महासंघाच्या विशेष सर्वसाधारण सभेत ही घटना दुरुस्ती करण्यात आल्याचे सुमारीवाला यांनी सांगितले.
वरिष्ठ पदांसाठी यापूर्वी निवडणूक घेण्यात आली होती मात्र या संदर्भात काही आक्षेप घेण्यात आल्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने ही निवडणूक पुन्हा घ्यावी अन्यथा संस्थेची मान्यता काढून घेतली जाईल, असा इशारा दिल्यानंतर महासंघाने तातडीने घटना दुरुस्ती करीत पुन्हा निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला.
भारतीय अॅथलेटिक्स महासंघाची २४ फेब्रुवारीला पुन्हा निवडणूक
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून मान्यता काढून घेतली जाईल या भीतीने भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने घटनादुरुस्ती करीत अध्यक्ष, सचिव आदी पदांसाठी २४ फेब्रुवारी रोजी पुन्हा निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
First published on: 28-01-2013 at 02:12 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian athletics fedration election again on 24th february