‘इंडियन बॅडमिंटन लीग’मध्ये पी.कश्यपच्या नेतृत्वाखाली बंगा बिट्सने महत्वपूर्ण सामन्यात अवध वारियर्सला त्यांच्या घरच्या मैदानात पराभूत केले आहे. अवध वॉरियर्सचा ३-१ ने पराभव करून लीगमध्ये विजयी खाते बंगा बिट्सने उघडले आहे.
बीबीडी अकादमीच्या कोर्टवर खेळविल्या गेलेल्या या सामन्यात वॉरियर्स संघाची पी.व्ही.सिंधु कडून अवध वॉरियर्स संघाला विजयाच्या आशा होत्या. परंतु
सलग दुसऱयांदा पी.व्ही.सिंधुच्या पदरात निराशाच पडली आहे.
सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये वेंग फेंग चोंगेने अवध वॉरियर्सचा प्रतिभावन खेळाडू के.हू युनच्या हाती निराशाच लागली सेटमध्ये ११-२१, २०-२१ ने पराभव झाल्यानंतर अवध वॉरियर्स संघाला पी.व्ही.सिंधुकडून चांगल्या कामगिरीच्या अपेक्षा होत्या, परंतु बंगा बिट्सच्या कैरोलीना मरीनने सिंधुचा २१-१६, २१-१३ असा पराभव केला.    

Story img Loader