इंडियन बॅडमिंटन लीगसाठी पाच फ्रँचायजींनी संघातील १९ वर्षांखालील खेळाडूंची निवड जाहीर केली. आयबीएलच्या नियमाप्रमाणे, प्रत्येक संघात १९ वर्षांखालील खेळाडू असणे बंधनकारक आहे. मुंबई मास्टर्स संघाने अव्वल खेळाडू हर्शील दाणी याचा समावेश केला आहे. दाणीने राष्ट्रीय स्पर्धेत १९ वर्षांखालील गटात जेतेपद पटकावले आहे.
क्रिश दिल्ली स्मॅशर्स संघाने उत्कर्ष अरोरा याला करारबद्ध केले आहे. पुणे पिस्टॉन्स संघाने पाच वेळा महाराष्ट्राची कर्णधार असलेली रेवती देवस्थळे हिला संघात समाविष्ट करून घेतले आहे. हैदराबाद हॉटशॉट्सने सी. राहुल यादव याला संघात स्थान दिले आहे. राहुलने २०१२च्या राष्ट्रीय स्पर्धेत सबज्युनियर गटाचे जेतेपद मिळवले होते. बांगा बीट्स संघाने डॅनियल फरीद याचा समावेश केला आहे. आवाढे वॉरियर्सने अद्याप ११व्या खेळाडूची निवड केलेली नाही. डॅनियलने १७ वर्षांखालील अखिल भारतीय मानांकन स्पर्धेवर मोहोर उमटवली होती.

Story img Loader