पुणे पिस्टन्सकडून अनपेक्षित पराभव स्वीकारल्यानंतर भारतीय बॅडमिंटन लीगमध्ये आपले आव्हान राखण्यासाठी बांगा बिट्सला क्रिश दिल्ली स्मॅशर्सविरुद्ध विजय मिळविण्यासाठी खडतर परिश्रम करावे लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घरच्या मैदानावर विजय मिळविण्यासाठी बांगा संघ उत्सुक असला, तरी पुण्याकडून झालेल्या पराभवाची धग अद्यापही त्यांना जाणवत आहे. त्यांच्या हुओ युआन, ऑलिम्पिकपटू पारुपल्ली कश्यप यांना पुण्याकडून खळबळजनक पराभवास सामोरे जावे लागले होते. कॅरोलीन मरीन हिला महिलांच्या एकेरीत ज्युलियन शेंकविरुद्ध अपेक्षेइतका प्रभाव दाखविता आला नव्हता.
दिल्लीचे बाद फेरीचे आव्हान जवळ जवळ संपुष्टात आले असले तरी बांगा संघाविरुद्ध विजय मिळविण्यासाठी त्यांचा प्रयत्न राहील. प्रामुख्याने त्यांची मदार बी.साईप्रणीत, अरुंधती पानतावणे यांच्यावर राहणार आहे. हैदराबादविरुद्धच्या लढतीत त्यांची स्टार खेळाडू ज्वाला गट्टा दुखापतीमुळे सहभागी झाली नव्हती. मिश्रदुहेरीत तिचा सहभाग अपेक्षित आहे. दिल्ली संघास बुन हुआंग तान व किएत कितकुओ या जोडीकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. साखळी गटात बांगा बिट्स सध्या चौथ्या स्थानावर आहे तर दिल्ली संघ पाचव्या क्रमांकावर आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian badminton leaguedelhi takes over banga beats