विराट कोहलीच्या अनुपस्थिती रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाची चौथ्या वन-डे सामन्यात चांगलीच दाणादाण उडाली. ट्रेंट बोल्ट आणि कॉलिन डी-ग्रँडहोम यांच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय संघाचा डाव एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाची दशा पाहून नेटकऱ्यांनी भारतीय संघाला चांगलचं ट्रोल केलं आहे.

भारतीय संघ या सामन्यात अवघ्या 92 धावांपर्यंत मजल मारु शकला. बोल्टने 5 तर कॉलिन डी-ग्रँडहोमने 3 बळी घेतले.

Story img Loader