Bhuvneshwar Kumar donates Rs 10 lakh to Gurukul Ashram: टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार बराच काळ संघातून बाहेर आहे.. मात्र, तो आयपीएल २०२३ च्या हंगामात खेळताना दिसला होता. यंदाच्या हंगामात तो सनरायझर्स हैदराबादचा भाग होता. मात्र, त्याची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात निवड झाली नाही.आता भुवनेश्वर कुमार एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. या वेगवान गोलंदाजाने गुरुकुल आश्रमाला १० लाख रुपये देणगी म्हणून दिले आहेत. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नसून, मीडिया रिपोर्ट्समध्ये हे दावे केले जात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भुवनेश्वर कुमारने गुरुकुल आश्रमाला दिले १० लाख रुपये –

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने गुरुकुल आश्रमाला १० लाख रुपये देणगी दिली आहे. वास्तविक, त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी पैसे दिले आहेत. पण भारतीय संघाच्या गोलंदाजाने मुलांच्या शिक्षणासाठी गुरुकुल आश्रमाला १० लाख रुपये देणगी म्हणून दिल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे.

आयपीएल २०२३मध्ये भुवनेश्वर कुमारची कामगिरी –

विशेष म्हणजे भुवनेश्वर कुमार टीम इंडियातून बाहेर आहे. तो शेवटचा आयपीएल २०२३ च्या हंगामात मैदानावर खेळताना दिसला होता. आयपीएल २०२३ हंगामात भुवनेश्वर कुमारने सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना १४ सामन्यात १६ विकेट घेतल्या होत्या. यादरम्यान भुवनेश्वर कुमारचा स्ट्राइक रेट १९.१२ तर सरासरी २६.५६ होती. याशिवाय त्याने १६० आयपीएल सामने खेळले आहेत. सनरायझर्स हैदराबादशिवाय भुवनेश्वर कुमार आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पुणे वॉरियर्सकडून खेळला आहे.

हेही वाचा – County Cricket: शेन वॉर्ननंतर आता ‘या’ फिरकीपटूने टाकला ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’, VIDEO होतोय व्हायरल

भुवनेश्वर कुमारची आंतरराष्ट्रीय कारकीर्द –

दुसरीकडे, या वेगवान गोलंदाजाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने २१ कसोटी सामन्यांव्यतिरिक्त त्याने १२१ एकदिवसीय आणि ८७ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ६३ आणि एकदिवसीय क्रिकेमध्ये १४१ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर भुवनेश्वर टी-२o क्रिकेटमध्ये ९० विकेट्स घेतल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian bowler bhuvneshwar kumar donates rs 10 lakh to gurukul ashram for childrens education vbm