प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारायची आणि नंतर त्या धावसंख्येचा यशस्वी बचाव हे सूत्र अवलंबत भारतीय संघाने तिरुवनंतपुरम इथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी२० सामन्यात ४४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतला पुढचा सामना गुवाहाटी इथे २८ तारखेला होणार आहे. भारताने २३५ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाने १९१ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला खरा पण भारतीय फलंदाजांनी मनमुराद फटकेबाजी केली. यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड जोडीने सहाव्या षटकात ७७ धावांची सलामी दिली. जैस्वालने ९ चौकार आणि २ षटकारांसह २५ चेंडूत ५३ धावांची खेळी केली. यानंतर ऋतुराजला इशान किशनची साथ मिळाली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ५८ चेंडूत ८७ धावांची भागीदारी केली. इशानने ३२ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ५२ धावा चोपल्या. धडाकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध आणि या मालिकेसाठी कर्णधाराच्या भूमिकेत असणारा सूर्यकुमार यादव १९ धावा करुन तंबूत परतला. ऋतुराज गायकवाडने एक बाजू सांभाळत अर्धशतकी खेळी साकारली. त्याने ४३ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. रिंकू सिंगने अवघ्या ९ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ३१ धावा केल्या आणि भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर २३६ धावांचं लक्ष्य ठेवलं. ऑस्ट्रेलियातर्फे नॅथन एलिसने ३ विकेट्स पटकावल्या.

West Indies defeated by Indian women team sports news
भारतीय महिला संघाकडून विंडीजचा धुव्वा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sam Constas statement about Indian bowlers sports news
भारतीय गोलंदाजांसाठी माझ्याकडे योजना तयार -कोन्सटास
IND vs AUS Australia Declared Innings on 89 Gives 275 Runs Target to India in 54 Overs in Gabba Test
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा माईंड गेम, झटपट धावा करत भारताला विजयासाठी दिलं इतक्या धावांचं लक्ष्य
India vs Australia 3rd Test Cricket Match KL Rahul statement on batting sports news
पहिली ३० षटके गोलंदाजांची, मग फलंदाजी सोपी- राहुल
IND vs AUS Big Blow to Australia as Josh Hazlewood Suffers Calf Injury went Hospital for Scans Gabba Test
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाला गाबा कसोटीत मोठा धक्का, ‘या’ गोलंदाजाला नेलं हॉस्पिटलमध्ये; एक षटक टाकताच गेला होता मैदानाबाहेर
IND vs AUS Isa Guha Racial Comment on Jasprit Bumrah During Gabba Test Called him primates
IND vs AUS: पुन्हा मंकीगेट प्रकरण? जसप्रीत बुमराहवर महिला कमेंटेटरने केली वर्णभेदात्मक टिप्पणी, गाबा कसोटीत नव्या वादाला फुटलं तोंड
IND vs AUS Australia all out on 445 runs
हेड-स्मिथच्या शतकाने भारताला गाबा कसोटीत टाकलं बॅकफूटवर, ऑस्ट्रेलियाने पहिल्याच डावात उभारला धावांचा डोंगर

प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाने मॅथ्यू शॉर्ट, जोश इंगलिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांना झटपट गमावलं. पाठोपाठ स्टीव्हन स्मिथही तंबूत परतला. यानंतर मार्कस स्टॉइनस आणि टीम डेव्हिड यांनी ३८ चेंडूत ८१ धावांची शानदार भागीदारी रचली. रवी बिश्नोईने ही जोडी फोडली. डेव्हिडने ३७ धावांची खेळी केली. थोड्या अंतरात मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर मार्कस स्टॉइनस बाद झाला. त्याने २५ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. प्रसिध कृष्णाने शॉन अबॉटला त्रिफळाचीत केलं. यानंतर मॅथ्यू वेडचा ४२ धावांचा अपवाद वगळता बाकी फलंदाजांनी शरणागती पत्करली. भारतातर्फे प्रसिध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी तीन विकेट्स पटकावल्या. अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Story img Loader