Wasim Akram on India vs Australia WTC Final: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या फायनलचे काउंटडाउन सुरू झाले आहे. लंडनमधील ओव्हल मैदानावर ७ जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येणार आहेत. डब्लूटीसीच्या दुसऱ्या आवृत्तीची ही अंतिम फेरी आहे. सन २०२१मध्ये, जेव्हा पहिल्या आवृत्तीचा विजेतेपद सामना खेळला गेला, तेव्हा भारताचा न्यूझीलंडकडून ८ गडी राखून पराभव झाला होता. टीम इंडियाची नजर आता जुन्या आठवणी विसरून इतिहास रचण्यावर असेल. मात्र, अंतिम फेरीत भारतीय संघापेक्षा ऑस्ट्रेलियन संघ जिंकण्याची शक्यता जास्त आहे, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अनुभवी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याने व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका कार्यक्रमात ‘स्विंग ऑफ सुलतान’ अक्रमने डब्ल्यूटीसी फायनलचे भाकीत केले आणि ऑस्ट्रेलियाचा सामन्यात वरचष्मा असेल असे त्याने विधान केले. ५७ वर्षीय माजी खेळाडूने सांगितले की, “ओव्हलची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल आहे, ज्यामुळे भारतीय फलंदाजांना सामन्यात अडचणीचा सामना करावा लागू शकतो.” तो असेही म्हणतो की, “खेळपट्टीचा पृष्ठभाग हा उसळत्या चेंडूला अधिक मदत करणारा आहे. त्यामुळे उंच बाऊन्सचा धोका असल्याने भारतीय फलंदाजीला खूप सावध राहावे लागेल.” अक्रम म्हणाला की, “ड्यूक्सचा चेंडू कुकाबुरापेक्षा खूप जास्त स्विंग करतो.” माहितीसाठी, डब्ल्यूटीसी फायनल ड्यूक बॉलने खेळली जाणार आहे. आयपीएल २०२३ मध्येच भारतीय खेळाडूंनी ड्यूक बॉलने सराव सुरू केला होता.

पाकिस्तानचा माजी कर्णधार म्हणाला की, “तुम्ही ओव्हलमध्ये ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात खेळपट्टी पूर्णपणे कोरडी असताना कसोटी सामने खेळता. पण यावेळी नवीन खेळपट्टी आहे आणि ही जूनची सुरुवात आहे त्यामुळे येथे भरपूर उसळी असेल. ड्यूक चेंडू जास्त काळ स्विंग करतो आणि कूकाबुरापेक्षा तो खूप कठीण राहतो. मला वाटते की ऑस्ट्रेलिया हा फायनलसाठी थोडा अधिक प्रबळ दावेदार असेल.”

मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज सारखे भारतीय वेगवान गोलंदाज मैदानावर जबरदस्त गोलंदाजी करतील, अशी आशा अक्रमला आहे. आयसीसीनुसार, अक्रम म्हणाला, “भारतीय गोलंदाज खूप अनुभवी आहेत आणि त्यांना कोणीही गृहीत धरू नये. जेव्हा नवीन चेंडू हातात येतो तेव्हा अधिक धोकादायक असतात. आपल्या सर्वांना माहित आहे की चेंडू १० ते १५ षटकांमध्ये स्विंग होतो, म्हणून वेगवान गोलंदाज म्हणून पहिल्या १० ते १५ षटकांमध्ये अतिरिक्त धावा काढू नयेत आणि तेच ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी केले. भारताला चौथी डावात फलंदाजी करायची आहे हे त्यांनी विसरू नये.”

हेही वाचा: WTC Final IND vs AUS: “मी स्वतःहा शुबमनला मदत करेन पण…”, ‘किंग’ आणि ‘प्रिन्स’च्या टॅगवर विराट कोहलीने सोडले मौन

लक्षणीय बाब म्हणजे, भारताने ओव्हलवर आतापर्यंत १४ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात फक्त दोनच विजय मिळवता आले आहेत. संघाला पाच सामन्यांत ५ पराभव स्वीकारावे लागले आणि अनिर्णित राहावे लागले. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाने येथे ३८ पैकी फक्त ७ कसोटी जिंकल्या आहेत. कांगारू संघाला १७ सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आणि १४ सामने अनिर्णित राहिले. या सामन्यासाठी पाच दिवसात निकाल आला नाही तर अतिरिक्त ठेवला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian bowlers will be misled in wtc final know why the pakistani veteran wasim akram is scared avw