जागतिक स्पर्धेत पाच वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मेरी कोमने Boxer Mary Kom आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदकाची Gold Medal कमाई केली. अंतिम सामन्यात मेरी कोमने उत्तर कोरियाच्या किम ह्योंगला पराभूत केले. आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत ४८ किलो वजनी गटातील तिचे पहिले सुवर्ण आहे. यापूर्वी मेरी कोम ५१ किलो वजनी गटातून सहावेळा या स्पर्धेत उतरली होती. यात २००३, २००५, २०१० आणि २०१३ असे चार वेळा तिने सुवर्ण पदकाची कमाई केली होती. तर २००८ मध्ये तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. यावेळी ती पहिल्यांदाच ४८ किलो गटात या स्पर्धेत सहभागी झाली होती. उपांत्य फेरीत जपानच्या सुबोसाविरुद्ध आक्रमक खेळ दाखवत तिने अंतिम फेरी गाठली होती.
Indian boxer M C Mary Kom (48kg) @MangteC wins gold medal at #AsianBoxingChampionships. #ASBC2017Women.
आणखी वाचा— Press Trust of India (@PTI_News) November 8, 2017
यापूर्वी आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या सीमा पुनिया, एल. सरिता देवी (६४ किलो), प्रियांका चौधरी (६० किलो), लोवलीना बोर्गोहेम (६९ किलो) आणि शिक्षा (५४ किलो) यांचा उपांत्य फेरीत पराभव झाला. त्यामुळे या महिला खेळाडूंना कास्य पदकावर समाधान मानावे लागले होते.