World Boxing Championship Updates: दीपक भोरिया, मोहम्मद हसमुद्दीन आणि निशांत देव यांनी बुधवारी आयबीए पुरुषांच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारतासाठी तीन पदके निश्चित केली. दीपकने ५१ किलो वजनी गटात किर्गिस्तानच्या नुरझिगित दुशेबाएवचा ५-० असा पराभव केला. निशांतने एकमताने निर्णय घेत क्यूबाच्या जॉर्ग क्युलरला अशाच प्रकारे पराभूत केले. हसमुद्दीनने ५७ किलो वजनी गटात बल्गेरियाच्या जे डियाज इबानेझचा ४-३ असा पराभव केला. यासह, जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये प्रथमच भारतीय पुरुष बॉक्सरने तीन पदके निश्चित केली आहेत.

दीपक भोरिया, मोहम्मद हसमुद्दीन आणि निशांत देव यांच्या आधी भारताच्या पुरुष बॉक्सर्सनी जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये 7 पदके जिंकली आहेत. विजेंदर सिंग (२००९ मध्ये कांस्य), विकास कृष्णन (२०११ मध्ये कांस्य), शिव थापा (२०१५ मध्ये कांस्य), गौरव बिधुरी (२०१७ मध्ये कांस्य), मनीष कौशिक (२०१९ मध्ये कांस्य), अमित पंघल (२०१९ मध्ये रौप्य) आणि आकाश कुमार. (२०२१ मध्ये कांस्य) भारताला पदक मिळवून दिले आहे. तिन्ही बॉक्सर शुक्रवारी उपांत्य फेरीत खेळतील.

maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
Bhool Bhulaiyaa 3 Vs Singham Again Collection
‘सिंघम अगेन’च्या दमदार स्टारकास्टवर एकटा कार्तिक आर्यन पडला भारी! ‘भुलै भुलैया ३’ने नवव्या दिवशी कमावले तब्बल…

२०१९ मध्ये भारताची सर्वोत्तम कामगिरी होती –

उपांत्यपूर्व फेरीतील विजय म्हणजे तिन्ही बॉक्सर किमान कांस्य पदकासह परततील. यापूर्वी, भारताची सर्वोत्तम कामगिरी २०१९ मध्ये होती, जेव्हा भारताने अमित पंघलच्या रौप्य आणि मनीष कौशिकच्या कांस्यपदकासह दोन पदके जिंकली होती. बुधवारी प्रथम रिंगमध्ये प्रवेश करताना दीपकने फ्लायवेट प्रकारात किर्गिस्तानच्या नुरझिगित दुशेबाएवचा ५-० असा एकमताने पराभव करून आपली प्रभावी कामगिरी सुरू ठेवली. हा वजन वर्ग पॅरिस ऑलिम्पिकचाही भाग आहे.

दीपकने सुरुवातीपासूनच आक्रमक दृष्टिकोन ठेवला –

दीपकने चढाईत अशा प्रकारे वर्चस्व गाजवले की रेफ्रींना दुशेबाएव्हला दोनदा मोजावे लागले. भारतीय बॉक्सरने सुरुवातीपासूनच आक्रमक दृष्टिकोन स्वीकारला आणि अचूक पंचेस केले. ०-५ ने पिछाडीवर पडलेल्या दुशेबाएवने दुसऱ्या फेरीत आक्रमक खेळ केला, पण दीपकने उत्कृष्ट बचाव आणि प्रतिआक्रमणांनी त्याला मागे टाकले. पहिल्या दोन फेऱ्या जिंकल्यानंतर दीपकने तिसऱ्या आणि अंतिम फेरीत बचावात्मक दृष्टिकोन स्वीकारला आणि प्रतिस्पर्ध्याला एकही संधी दिली नाही.

हेही वाचा – IPL 2023: पराभवानंतर गोलंदाजांऐवजी आरसीबीचे प्रशिक्षक फलंदाजांवर भडकले, जाणून घ्या काय आहे कारण?

दीपकची उपांत्य फेरीत फ्रान्सच्या बी बेनामाशी लढत होईल –

दीपक म्हणाला, “आमची योजना डावीकडून खेळायची आणि प्रतिस्पर्ध्यापासून अंतर राखायची होती. माझे मनोबल उंचावले आहे कारण मी उपांत्य फेरीत पोहोचलो आहे.” दीपक आता शुक्रवारी उपांत्य फेरीत फ्रान्सच्या बी बेनामाशी भिडणार आहे. दोन वेळा राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या हुसामुद्दीनला बल्गेरियाच्या जे डियाझ इबानेझविरुद्ध घाम गाळावा लागला. त्याने हा सामना ४-३ अशा फरकाने जिंकला.

उपांत्य फेरीत हुसामुद्दीनचा सामना क्युबाच्या सिडेल होर्टाशी होईल –

हुसामुद्दीन म्हणाला, “ही एक कठीण लढत होती. कारण माझ्या प्रतिस्पर्ध्याने खडतर खेळ केला होता. ज्यामुळे मला काही समस्या निर्माण झाल्या होत्या, पण कसा तरी मी जिंकून पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला. मला ते करत राहावे लागले आणि प्रतिस्पर्ध्याला माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू देण्याची होती. हा मार्ग यशस्वी ठरला. कारण मी त्याला एका बाजूने भरपूर पंच मारले आणि गुण मिळविले.” उपांत्य फेरीत हुसमुद्दीनचा सामना क्युबाच्या सिडेल होर्टाविरुद्ध होईल. त्यानंतर निशांतने एकमताने घेतलेल्या निर्णयात क्युबाच्या जॉर्ज सॉलरचा पराभव करून भारतासाठी तिसरे पदक निश्चित केले.

हेही वाचा – IPL 2023: गुजरात टायटन्स १५ मे रोजी लॅव्हेंडर रंगाच्या जर्सीमध्ये मैदानात उतरणार, कारण जाणून तुम्हाला होईल आनंद

निशांत अस्लानबेकची लढत शिम्बरगेनोव्हशी होईल –

गतविजेता २२ वर्षीय निशांत आक्रमक होता आणि त्याने चढाओढीच्या संपूर्ण नऊ मिनिटे क्यूबाच्या प्रतिस्पर्ध्यावर पंचांचा पाऊस पाडला. गेल्या स्पर्धेत निशांतला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला होता. निशांत म्हणाला, “आमची रणनीती पहिल्या फेरीपासूनच प्रतिस्पर्ध्यावर दबाव टाकणे आणि संपूर्ण चढाईत मानसिकदृष्ट्या मजबूत राहणे ही होती.” तो पुढे म्हणाला,” मी त्याच सकारात्मक मानसिकतेने पुढच्या फेरीत जाईन आणि अंतिम फेरीत प्रवेश करेन. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळवणे खूप छान आहे. पण मी सुवर्णपदक घेऊन भारतात परतेन. अंतिम फेरीसाठी निशांतची लढत आशियाई चॅम्पियन कझाकिस्तानच्या अस्लानबेक शिम्बर्गेनोव्हशी होईल.