लांबणीवर पडलेले सराव शिबीर आणि त्यामुळे चर्चाना आलेले उधाण यामुळे भारतीय बॉक्सर्सच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील सहभागाविषयी साशंकता व्यक्त केली जात होती. पण भारतीय संघाच्या सराव शिबिराला मंगळवारपासून पतियाळात सुरुवात होत असल्यामुळे बॉक्सर्स आता विश्व अजिंक्यपद स्पर्धेत पदकांचा पंच लगावण्यासाठी सज्ज झाले आहेत.
भारतीय बॉक्सिंग महासंघावर बंदी असल्यामुळे बॉक्सर्सना तिरंग्याखाली उतरता येणार नसले तरी भारताचा १० जणांचा संघ ११ ते २७ ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी कझाकिस्तानला रवाना होणार आहे. २०१०-११मध्ये सलग आठ सुवर्णपदकांची कमाई करणारा सुरंजॉय सिंग गुडघ्याच्या दुखापतीमुळे िरगबाहेर गेला होता. पण आता दुखापतीतून सावरल्यानंतर सुरंजॉय पुन्हा एकदा िरगमध्ये परतण्यासाठी उत्सुक आहे. आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या थॉकचॉन ननाओ सिंग याच्यासमोर भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी एल. देवेंद्र सिंग याचे आव्हान असणार आहे. ५६ किलो वजनी गटात १९ वर्षीय शिवा थापाला संधी मिळण्याची शक्यता आहे. शिवा थापा सध्या तुफान फॉर्मात असून या वर्षी झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो भारताचा एकमेव बॉक्सर ठरला होता.
विजेंदरचा गट ७५ की ८१ किलो वजनी गटाचा असणार, याबाबत संभ्रमावस्था आहे. मात्र विजेंदर ७५ किलो गटातूनच खेळणार असल्याचे समजते. ऑलिम्पियन सुमीत संगवान ८१ किलो वजनी गटासाठी प्रबळ दावेदार समजला जात आहे. ९१ किलो आणि ९१ किलोवरील गटात स्थान मिळवण्यासाठी बरीच चुरस पाहायला मिळणार आहे.
विश्व अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय बॉक्सर्स सज्ज
लांबणीवर पडलेले सराव शिबीर आणि त्यामुळे चर्चाना आलेले उधाण यामुळे भारतीय बॉक्सर्सच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील सहभागाविषयी साशंकता व्यक्त केली जात होती.
आणखी वाचा
First published on: 27-08-2013 at 02:28 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian boxers ready for world boxing championship trials