ताश्कंद (उजबेकिस्तान) : पुरुष विभागाच्या जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेला सोमवारपासून सुरुवात होत असून, भारतीय बॉक्सिंगपटू या स्पर्धेत आपली कामगिरी उंचावण्याच्या इराद्याने उतरतील. स्पर्धेच्या अखेरच्या पर्वात भारताला केवळ एका कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. स्पर्धेत एकूण सात गतविजेते सहभागी झाले आहेत.

महिला स्पर्धेप्रमाणे या स्पर्धेलाही ऑलिम्पिक पात्रतेचा दर्जा नाही. यानंतरही आशियातील बॉक्सिंगपटू आशियाई क्रीडा स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून या स्पर्धेकडे बघतील. ऑलिम्पिकसाठी पुरुष गटातही वजन गट बदलण्यात आले आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत १३ ऐवजी सातच वजनी गटांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ५१, ५७, ६३.५, ७१, ८०, ९२ आणि ९२ किलोपेक्षा अधिक अशा वजनी गटांचा समावेश आहे.

maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?
khamgaon buldhana assembly constituency
खामगावात आकाश फुंडकर – दिलीप सानंद यांच्यात चुरशीची लढत; गटबाजी, मतविभाजन निर्णायक
Baramati Assembly Constituency Assembly Election 2024 Ajit Pawar Yugendra Pawar print politics news
लक्षवेधी लढत: बारामती : बारामती कोणत्या पवारांची?
India wicketkeeper batsman Sanju Samson expressed his feelings about the comeback sport news
अपयशानंतर स्वत:च्याच क्षमतेवर प्रश्न! कर्णधार, प्रशिक्षकांच्या पाठिंब्यामुळे बळ; विक्रमवीर सॅमसनची भावना

भारताची मदार प्रामुख्याने सहा आशियाई पदकविजेता राहिलेल्या शिवा थापा याच्यावर असेल. शिवा ६३.५ किलो वजन गटातून खेळणार आहे. याशिवाय २०१९ स्पर्धेत रौप्यपदक मिळवणारा अमित पंघाल आणि गतवर्षीचा कांस्यदक विजेता आकाश कुमार यांच्याही कामगिरीकडे नजरा असतील. शिवाने सहा आशियाई पदके मिळवली असून, २०१५ मध्ये जागतिक स्पर्धेतील कांस्यपदकही त्याच्या नावावर आहे. आता या वेळी पदकाचा रंग बदलण्यासाठी शिवा अधिक उत्सुक असेल.

याखेरीज हुसामुद्दिन (५७ किलो) आणि आशीष चौधरी (८० किलो) यांच्याही कामगिरीकडे भारतीय चाहत्यांचे लक्ष असेल. हुसामुद्दिन राष्ट्रकुल पदक विजेता आहे, तर आशीष आशियाई स्पर्धेतील माजी पदक विजेता आहे. त्याच्याकडे टोक्यो ऑलिम्पिकचाही अनुभव आहे. ही आशीषची दुसरी जागतिक स्पर्धा आहे. सचिन सिवस (५४ किलो) आणि हर्ष चौधरी (८६ किलो) हे युवा खेळाडूही आपली प्रतिभा दाखवण्यासाठी सज्ज असतील. विरदर सिंग (६० किलो), आकाश सांगवान (६७ किलो), निशांत देव (७१ किलो), सुमित कुंडू (७५ किलो) हे अन्य खेळाडूही भारतीय संघात आहेत.