न्यूझीलँडमध्ये पार पडणाऱ्या आगामी U-19 विश्वचषकासाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईकर पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ यंदा विश्वचषक जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. १३ जानेवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अवश्य वाचा – विराट कोहलीपेक्षा स्टिव्ह स्मिथ सरस, अॅशेस मालिका विजयानंतर शेन वॉर्नची स्तुतीसुमनं

“१९ वर्षाखालील विश्वचषक जिंकणं हा माझ्या कारकिर्दीतला सर्वात महत्वाचा टप्पा होता. एखाद्या खेळाडूसाठी ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं नाव मोठं करण्यासाठी फायदेशीर ठरते. माझ्यासाठी ही स्पर्धा खूप महत्वाची आहे. त्यामुळे मिळालेल्या संधीचा आदर करुन चांगली कामगिरी करा”, अशा शुभेच्छा विराट कोहलीने आपल्या संघाला दिल्या आहेत.

अवश्य वाचा – ‘विराट कोहलीच टीम इंडियाचा बॉस’

२००८ साली विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताच्या U-19 संघाने विश्वचषकावर नाव कोरलं होतं. सध्या न्यूझीलँडच्या संघाचं कर्णधारपद भूषवत असलेल्या केन विलियमसनला विराट त्याच्या फलंदाजीचं कौतुक केलं. त्यामुळे भारतीय कर्णधाराकडून मिळालेल्या कानमंत्राचा वापर करत U-19 भारतीय संघ विश्वचषक भारतात आणतो का हे पहावं लागणार आहे.कोहलीच्या संघाने उपांत्य फेरीत पराभवाची धूळ चारली होती. यावेळी विराटने केन विलियमसोबतच्या आठवणी जागवत

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian captain virat kohli gives tips to u 19 indian team for the world cup says respect the opportunity