Rohit Sharma on Ishan Kishan: टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला कर्णधार रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पदार्पण करण्याची संधी दिली. मात्र, किशनला २० चेंडूत केवळ एक नाबाद धाव काढता आली. कारण, त्यानंतर भारताने डाव घोषित केला. मात्र, आता रोहित शर्माने इशानला दुसऱ्या कसोटीत आणखी संधी देण्याचे संकेत दिले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
इशानची पहिली कसोटीकडे पाहायचे झाल्यास, विशेषत: ऋषभ भारतीय संघाचा भाग नसताना, रोहित शर्माने सांगितले की, “इशान किशन खूप हुशार मुलगा आहे. भारतासाठी त्याच्या छोट्या कारकिर्दीत आपण तो कशा पद्धतीने फलंदाजी करतो हे आपण सर्वानीच पाहिले आहे. त्याने अलीकडेच मर्यादित षटकांमध्ये गेल्या डिसेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय २०० धावा केल्या होत्या. त्याच्याकडे खेळ आणि प्रतिभा आहे आणि तेच कौशल्य आपल्याला टीम इंडियासाठी वापरायचे आहे.”
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पुढे म्हणाला की, “पहिल्या कसोटीत फारशी फलंदाजी त्याच्या वाट्याला आली नाही त्यामुळे दुसऱ्या कसोटीत त्याला संधी देण्याची गरज आहे. तो डावखुरा फलंदाज असल्याने संघासाठी तो एक प्लस पॉईंट असून त्याला आक्रमक क्रिकेट खेळायला आवडते.” कर्णधाराने असेही सांगितले की, त्याने इशानला त्याचा खेळ कसा खेळावा? याबद्दल बोलला आहे.
रोहित म्हणाला की, “संघात त्याचा काय रोल असणार आहे? याबद्दल मी त्याच्याशी अगदी स्पष्ट बोललो आहे. मी इशानला आक्रमक फलंदाजी करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. त्याच्याकडे मोठे फटके मारण्याची क्षमता असल्याने संघासाठी मॅच विनर म्हणून ठरू शकतो. जर त्याला आक्रमक खेळण्यासाठी स्वातंत्र्य हवे असेल तर ते त्याला देणे हे आपले काम आहे. प्रत्येकाचा स्वाभाविक खेळ आहे वेगळा आहे. मला असं वाटत की त्याने त्याने आक्रमक फलंदाजी करून त्याचा नैसर्गिक खेळ पुढे सुरु ठेवणे गरजेचे आहे. ”
पुढे हिटमॅन म्हणाला की, “मला विशेषतः त्याच्या यष्टीरक्षणाबद्दल बोलायला आवडेल. त्याने आपली पहिली कसोटी खेळली आणि अश्विन आणि जडेजा यांच्या विरुद्ध खेळताना तो त्यात पास झाला. कारण, जिथे चेंडू फिरकी घेतो आणि उसळत असतो किंवा काही चेंडू खाली राहत असतात अशावेळी मला त्याचे विकेटकीपिंगमधील हात खाली ठेवण्याचे कौशल्य खूप आवडले. त्याच्या या कृतीमुळे मी खूप प्रभावित झालो.”
कर्णधार पुढे म्हणाला की, “दुर्दैवाने त्याला फक्त एक धाव करता आली कारण आम्हाला डाव घोषित करायचा होता. आमच्या आघाडीच्या फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी केल्याने त्याच्या वाट्याला फार कमी वेळ आला. जर दीर्घ फलंदाजी करायची संधी मिळाली तर इशान नक्कीच त्यात यशस्वी होतील यात मला कुठलीही शंका नाही.” रोहित शर्माने दुसर्या कसोटीपूर्वी विजयी कॉम्बिनेशन संघामध्ये कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता नाकारली. परंतु प्रतिकूल हवामानामुळे येथील क्वीन्स पार्क ओव्हल ट्रॅकबद्दल स्पष्टता येण्यास मदत झाली नाही हे त्याने मान्य केले.
हेही वाचा: Asia Cup 2023: आशिया चषकात भारत-पाकिस्तान दोन वेळा भिडणार, कसे असेल वेळापत्रक? जाणून घ्या
तो पुढे म्हणाला की, “डॉमिनिका येथे जेव्हा आम्ही खेळपट्टी पाहिली आणि परिस्थिती जाणून घेतली तेव्हा आम्हाला स्पष्ट कल्पना आली. इथे पावसाची चर्चा असल्याने खेळपट्टीबाबत अधिक स्पष्टता नाही, पण त्यात फारसा काही मोठा बदल होईल असे वाटत नाही. जी काही परिस्थिती असेल त्या आधारे आम्ही निर्णय घेऊ नाणेफेकीनंतर निर्णय घेऊ.”