१८ वर्षीय भारतीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने नेदरलँड्समध्ये झालेल्या टाटा स्टिल मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत वासनांध नजरांचा आणि तशाच प्रकारच्या वागणुकीचा सामना करावा लागल्याचा आरोप केला आहे. या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रेक्षकांना महिला बुद्धिबळपटूंच्या खेळापेक्षा त्या कशा दिसतात? कसे कपडे घालतात? कशा वावरतात, त्यांचे केस कसे आहेत यावर लक्ष केंद्रीत करण्यात जास्त रस असतो असं दिव्याने म्हटलं आहे. दिव्याने इंस्टाग्राम पोस्ट करत आपल्या मनातला संताप व्यक्त केला आहे.

काय आहे दिव्याची इंस्टाग्राम पोस्ट?

“मागच्या काही दिवसांपासून ही गोष्ट मनात होती. मात्र मी माझी बुद्धिबळ स्पर्धा संपण्याची वाट पाहात होते. मी हे कायमच पाहिलं आहे की बुद्धिबळ स्पर्धा सुरु असताना प्रेक्षक ती स्पर्धा किंवा आमचा खेळ गांभीर्याने घेत नाहीत. टाटा स्टील मास्टर्स स्पर्धेसाठी मी नेदरलँडला गेले होते. ती स्पर्धा खूप चांगली होती. मी तिथे काही सामने खेळले आणि मला ती स्पर्धा आणि तिथलं आयोजनही आवडलं. मात्र स्पर्धकांनी मला सांगितलं तसंच मीही अनुभव घेतला की प्रेक्षकांना आमचा (महिला बुद्धिबळपटू) खेळ कसा सुरु आहे यापेक्षा माझे कपडे कसे आहेत?, केस कसे बांधले आहेत, तसंच इतर गोष्टी कशा आहेत? यावर लक्ष केंद्रीत करायला आवडतं. जे पुरुष खेळाडू होते त्यांच्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचं काम प्रेक्षक करत होते. मात्र जेव्हा आम्ही खेळत होतो तेव्हा बहुतांश प्रेक्षक मी कशी दिसते?, माझे कपडे कुठले आहेत? मी कशी वावरते आहे? याकडे लक्ष देत होते. मी बुद्धिबळ कशी खेळते आहे? याच्याशी त्या प्रेक्षकांना काही घेणंदेणं नव्हतं.”

BAPS Swaminarayan Temple
न्यूयॉर्कमध्ये स्वामीनारायण मंदिराची तोडफोड; भिंतींवर लिहिल्या भारतविरोधी घोषणा, भारतीय दुतावासाने नोंदवला तीव्र निषेध
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Morne Morkel Favourite Indian Food
Morne Morkel : टीम इंडियाच्या मॉर्केल गुरुजींना कोणते भारतीय पदार्थ आवडतात? पाहा VIDEO
Success Story Of Ashley Nagpal
success story : मुंबईत खरेदी केलं ‘सी-फेसिंग अपार्टमेंट! वाचा भारतीय व्यावसायिक ॲशले नागपाल यांची यशोगाथा
Paralympic gold medal Praveen Kumar Paralympics sport news
हार न मानण्याची प्रवृत्ती हीच प्रवीणची ताकद
unil Gavaskar statement regarding the series in Australia that India is expected to dominate sport news
भारताचेच वर्चस्व अपेक्षित! ऑस्ट्रेलियातील मालिकेबाबत गावस्करांचे भाकीत
MS Dhoni opened up about his bond with Virat
MS Dhoni : ‘वयाचा फरक असला तरी, मी त्याचा…’, विराटबरोबरच्या नात्याबद्दल माही पहिल्यांदाच झाला व्यक्त, VIDEO व्हायरल
Hurun India Rich List 2024 | who is the richest Indian Professional Manager | Jayshree Ullal
Hurun Rich List : सर्वात श्रीमंत भारतीय व्यावसायिक व्यवस्थापक जयश्री उल्लाल कोण? त्यांची एकूण संपत्ती किती?

महिला खेळाडूंच्या कपड्यांकडे जास्त लक्ष दिलं जातं

आपल्या पोस्टमध्ये दिव्या पुढे म्हणते, “जेव्हा महिला बुद्धिबळपटू बुद्धिबळ खेळतात तेव्हा त्या किती चांगलं खेळत आहेत याकडे दुर्लक्ष केलं जातं. जो खेळ महिला बुद्धिबळपटू करतात तिथे त्यांची बुद्धी खरोखरच पणाला लागलेली असते. मी जेव्हा मुलाखत देत होते तेव्हाही मी पाहिलं की लोक माझा खेळ कसा आहे याकडे न पाहता माझ्या शरीराकडे, माझ्या कपड्यांकडे, केसांकडे पाहात होते. मी कसा खेळ केला आणि मला काय अडचणी आल्या? हे जाणून घेणाऱ्यांची संख्या खूपच कमी होती.”

मी आत्ता जेमतेम १८ वर्षांची आहे पण..

त्यानंतर दिव्या म्हणाली, “मी आत्ता जेमतेम १८ वर्षांची आहे. महिलांची प्रगती मोठ्या प्रमाणावर होते आहे. मात्र महिला खेळाडूंना अशा प्रकारच्या दुर्व्यवहार सहन करावा लागतो. कायमच त्यांच्या खेळापेक्षा कपडे, फॅशन आणि इतर गोष्टींवर चर्चा केली जाते. महिला खेळाडूंचं मोठ्या प्रमाणावर कौतुकही होत नाही. त्यांच्याबद्दल वाईटच बोललं जातं. मी जेव्हापासून खेळ खेळू लागले आहे तेव्हापासून मी अशा वाईट नजरांचा आणि तिरस्काराचा सामना जास्त केला आहे. महिला बुद्धिबळपटू असोत किंवा अॅथलिट असोत त्यांना योग्य सन्मान मिळाला पाहिजे” असं दिव्याने म्हटलं आहे.