Harsha Bhogle infected with dengue: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये टीम इंडियाची सुरुवात दमदार झाली आहे. टीम इंडियाने आपल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा आणि दुसऱ्यात सामन्यात अफगाणिस्तान संघाचा धुव्वा उडवला. आता टीम इंडियाचा तिसरा सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. हा सामना शनिवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात शुबमन गिल टीम इंडियाचा भाग असू शकतो. याआधी त्याला डेंग्यूची लागण झाली होती. आता त्याच्यानंतर भारताच्या एका दिग्गजाला डेंग्यू झाला आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्याला मुकणार आहे.
भारत १२ वर्षांनंतर २०२३ च्या विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. यावेळी भारतात डेंग्यूने थैमान घातले आहे. भारतीय संघाचा सलामीवीर शुबमन गिल डेंग्यूने बाधित झाल्यामुळे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहे, तर दरम्यान, भारताचा प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगलेलाही डेंग्यूची लागण झाली आहे. याबाबत हर्षा भोगलेने आपल्याला डेंग्यूची लागण झाल्याची माहिती एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करुन दिली आहे.
हर्षा भोगले भारत-पाक सामन्यातून बाहेर –
भारताचा माजी खेळाडू आणि सुप्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे १४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यातून बाहेर पडावे लागले आहे. हर्षा भोगले आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, ‘मी १४ तारखेला होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातून बाहेर पडावे लागल्याने निराश आहे. पण मला डेंग्यू आहे आणि परिणामी अशक्तपणा आणि प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे हे अशक्य आहे. मला आशा आहे की, मी १९ तारखेला सामन्यासाठी वेळेत परत येईन. माझे सहकारी आणि ब्रॉडकास्ट क्रू खूप उपयुक्त राहिले आहेत. मी वैयक्तिकरित्या त्यांचे आभार मानण्यास उत्सुक आहे.’
या सामन्यातून करणार पुनरागमन –
हर्षा भोगलेच्या कॉमेंट्रीला देशात खूप पसंती दिली जात आहे आणि भारत-पाक सामन्यात त्याची अनुपस्थिती चाहत्यांना आवडत नाही. हर्षा भोगलेच्या पुनरागमनाबद्दल बोलताना, अनुभवी समालोचकाने त्याच्या सोशल मीडिया हँडलद्वारे माहिती दिली आणि सांगितले की १९ ऑक्टोबर रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यातून ते कॉमेंट्रीच्या जगात पुनरागमन करू शकतात.