भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१७ सप्टेंबर) त्यांचा ७२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. जगभरातील सर्वात लोकप्रिय नेत्यांपैकी एक, नरेंद्र मोदी २०१४ मध्ये पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान झाले आणि २०१९ मध्ये दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार कामकाज करत आहे. या निमिताने अनेक भारतीय आजी – माजी खेळाडूंनी मोदींवर ट्विटरवरून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यामध्ये माजी भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्रींनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्याआधी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांना गुजरात आणि सौराष्ट्र क्रिकेट नियामक मंडळाकडून खेळणाऱ्या गुजरातच्या काही खेळाडूंनीही शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी हे एक खूप मोठे क्रिकेट प्रेमी आहेत आणि ते पुरुष आणि महिला या दोन्ही क्रिकेट संघांना जवळून फॉलो करतात. राष्ट्राला संबोधित करण्यासाठी रेडिओवरील कार्यक्रम “मन की बात” मध्ये त्यांच्या कामगिरीबद्दल नेहमीच कौतुक देखील करत असतात.

क्रिकेट हा असा खेळ आहे की जो संपूर्ण देशाला एकत्र आणतो असे पंतप्रधान मोदी नेहमी सांगतात. मिताली राज हिने शुभेच्छा देताना असे म्हटले आहे की, “पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे.” त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी सुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय अजून अनेक खेळाडूंनी देखील मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.