भारतीय क्रिकेट संघाला पहिला विश्वचषक चषक जिंकून तीस वर्षे पूर्ण झाली. १९८३ साली कपील देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने लॉर्ड्सच्या स्टेडियमवर इतिहास रचला. याविश्वचषक विजयामुळे भारतीय क्रिकेटला नवे वळण मिळाल्याचे भारताचे माजी कर्णधार कपील देव यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, “१९८३ च्या विश्वचषक विजयामुळे संपुर्ण भारताच्या क्रिकेटला नवे वळण मिळाले, आमचाही संघ युवा खेळाडूंचा होता आणि विश्वचषक जिंकल्यानंतर आमच्यात जिंकण्याची उर्जा निर्माण झाली. त्यादृष्टीने आम्ही विचार करण्यास सुरूवात केली. असाच सध्याचा भारतीय संघ आहे. २०११ चा विश्वचषक भारताने जिंकल्यामुळे संघाच्या खेळाडूंमध्ये आत्मविश्वास वाढला आणि प्रत्येक जण दबावाखाली न खेळता स्टेडियमवर आत्मविश्वाने खेळताना दिसतो.”  

Story img Loader