पीटीआय, नवी दिल्ली

न्यूझीलंडविरुद्धच्या सपशेल अपयशानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा, तसेच विराट कोहली आणि अन्यही काही अनुभवी खेळाडूंच्या भविष्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर काही कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

IPL 2025 Auction Rajasthan Royals Set To Retain 3 Star Players
IPL 2025 Auction : राजस्थान रॉयल्स IPL 2025 साठी संजू सॅमसनसह ‘या’ तीन स्टार खेळाडूंना करणार रिटेन, जाणून घ्या कोण आहेत?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
BCCI in Action Mode After India Streak Ending Defeat in Pune said No Optional Training Ahead of IND vs NZ Mumbai Test
IND vs NZ: भारताने कसोटी मालिका गमावल्यानंतर BCCIने काढलं फर्मान, प्रत्येक खेळाडूने मुंबईतील सामन्यापूर्वी…
IND vs NZ vs New Zealand 2nd Pune Test Match Updates in Marathi
IND vs NZ : १२ वर्षांनंतर भारताला मायदेशात कसोटी मालिका गमावण्याचा धोका, इतिहास बदलणार का?
Virat Kohli Tim Southee Fighting Video Goes Viral in India New Zealand 2nd Test Pune Watch
IND vs NZ: विराट कोहली आणि टीम साऊदी खरंच एकमेकांशी भांडत होते का? अंपायरसमोरचा ‘तो’ VIDEO व्हायरल
dhananjay chandrachud lecture on federalism and its potential
 ‘लोकसत्ता लेक्चर’मध्ये उद्या न्या. चंद्रचूड यांचे व्याख्यान
Rohit Sharma Breaks Kapil Dev's Embarrassing Record Ind Vs NZ 2nd Test
Rohit Sharma : रोहित शर्माने मोडला कपिला देव यांचा नकोसा विक्रम, टिम साऊदीसमोर पुन्हा दिसला हतबल
IND vs NZ India vs New Zealand 2nd Test Match Updates in Marathi
IND vs NZ : न्यूझीलंडने घेतला फलंदाजीचा निर्णय, भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन मोठे बदल, ‘या’ खेळाडूंना दिला डच्चू

भारतीय संघावर मायदेशातील कसोटी मालिकेत न्यूझीलंडकडून ०-३ अशी हार पत्करण्याची नामुष्की ओढवली. या मालिकेतील कामगिरीचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) पुनरावलोकन करणार असून त्याच वेळी जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या पुढील दोन वर्षांच्या चक्रासाठी संघबांधणीबाबत विचार करणार असल्याचे समजते. या परिस्थितीत रोहित, विराट, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या चारपैकी किमान दोन अनुभवी खेळाडूंसाठी ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका ही कारकीर्दीमधील अखेरची ठरण्याची शक्यता आहे.

‘‘आम्ही फार पुढचा विचार करू शकत नाही. आता आम्ही केवळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानंतर काय होणार हे ठाऊक नाही,’’ असे न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर रोहित म्हणाला.

हेही वाचा >>>Women’s Cricket: ४ वर्षांत ४ स्पर्धा! ICC ने महिला क्रिकेटचे वेळापत्रक जाहीर करताना केली मोठी घोषणा, पहिल्यांदाच खेळवली जाणार ‘ही’ मोठी स्पर्धा

‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची कर्णधार रोहित, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याबरोबर अनौपचारिक बैठक होण्याची शक्यता आहे. यात भारतीय संघाचा भविष्यातील मार्ग कसा असावा, यावर चर्चा केली जाऊ शकेल असे समजते.

‘‘भारतीय संघ १० नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे. त्यामुळे आता फारसा कालावधी शिल्लक नसल्याने ही बैठक अनौपचारिक असेल असा अंदाज आहे. न्यूझीलंडविरुद्धचे अपयश हे फार मोठे आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया मालिकेसाठीचा संघ आधीच जाहीर करण्यात आला आहे. आता त्यात बदल अपेक्षित नाही. परंतु भारतीय संघ ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरू न शकल्यास पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी चारपैकी काही अनुभवी खेळाडू संघात असणार नाहीत, हे निश्चित. तसेही हे चौघे मायदेशात पुन्हा एकत्रित खेळणार नाहीत’’ असे ‘बीसीसीआय’मधील वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>>AUS vs PAK : ‘प्लीज मला हरवू नकोस हां…’, पॅट कमिन्सच्या हातावर हात ठेवल्याने मोहम्मद रिझवान ट्रोल, मीम्सना उधाण

अन्य संघांच्या निकालांवर अवलंबून न राहता ‘डब्ल्यूटीसी’ची अंतिम फेरी गाठायची झाल्यास भारताला २२ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी मालिकेतील पाचपैकी चार सामने जिंकावे लागणार आहेत. ही मालिका गमावली तरी भारतीय संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकेल. मात्र, अन्य संघांना अपयश आले, तरच ते शक्य होईल.

कर्णधारपदासाठी गिल, पंत दावेदार

रोहित आणि विराट यांची कामगिरी भारतासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. फेब्रुवारी २०२१ पासून रोहितने ३५ कसोटी डावांत चार शतकांसह १२१० धावा केल्या आहेत. गेल्या १० डावांत तो सहा वेळा एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे. तसेच फेब्रुवारी २०२१ पासून विराटला मायदेशात २५ डावांत ७४२ धावाच करता आल्या आहेत, ज्यात केवळ एका शतकाचा समावेश आहे. परंतु विराटच्या तंदुरुस्तीचा उच्च स्तर पाहता तो आणखी काही वर्षे खेळणे अपेक्षित आहे. कसोटीत रोहितच्या भविष्याबाबत मात्र प्रश्न आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जसप्रीत बुमराला उपकर्णधार करण्यात आले आहे. मात्र, तो वेगवान गोलंदाज असल्याने भविष्यात त्याला सातत्याने सामने खेळणे अवघड जाऊ शकेल. त्यामुळे कसोटी संघाचा पुढील पूर्णवेळ कर्णधार म्हणून शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांना प्रमुख दावेदार मानले जात आहे.

सुदर्शन, पडिक्कल संधीच्या प्रतीक्षेत

● यंदा ‘डब्ल्यूटीसी’ची अंतिम फेरी न गाठता आल्यास, भारतासाठी या स्पर्धेच्या पुढील चक्राला २० जून २०२५ पासून इंग्लंडविरुद्धच्या मालिकेने सुरुवात होईल. या मालिकेसाठी युवकांचा विचार होण्याची दाट शक्यता आहे.

● साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल यांसारखे फलंदाज संधीच्या प्रतीक्षेत आहेत. भारत ‘अ’ संघाकडून खेळताना या दोघांनी छाप पाडली आहे. तसेच ऑफ-स्पिन गोलंदाजी करणारा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत चमकदार कामगिरी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर अश्विनच्या भविष्याबाबत चर्चा केली जाऊ शकेल.

● जडेजाला आणखी काही काळ संघात कायम ठेवले जाऊ शकेल. अश्विनपेक्षा फलंदाजीत सरस आणि अधिक तंदुरुस्त असणारा जडेजा परदेशातही योगदान देण्यात सक्षम आहे. त्यामुळे सध्या त्याच्या स्थानाला धोका नाही. मात्र, त्याचीही कामगिरी खालावल्यास भारताकडे डावखुरे फिरकीपटू म्हणून अक्षर पटेल आणि मानव सुथार यांसारखे पर्याय उपलब्ध आहेत.