Indian Cricket Team with Most T20I Centuries: तिलक वर्माचे पहिले टी-२० आंतरराष्ट्रीय शतक आणि भारतीय संघाने जागतिक क्रिकेटमध्ये इतिहास घडवला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताच्या युवा फलंदाजांनी दमदार फटकेबाजी केली. सलामीवीर युवा फलंदाज अभिषेक शर्माची बॅट पुन्हा एकदा तळपली आणि २५ चेंडूत शानदार अर्धशतक झळकावले. तर तिलक वर्माने नाबाद १०७ धावांची शानदार खेळी केली. या दोन्ही खेळाडूंच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने आफ्रिकेला २२० धावांचे आव्हान दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतासाठी तिसऱ्या टी-२० सामन्याची सुरुवात खूपच खराब झाली. संजू सॅमसन सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. यानंतर अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांनी धावा काढण्याची जबाबदारी घेतली. तिलकने ५६ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकारांसह १०७ धावा केल्या. अभिषेकने ५० धावांचे योगदान दिले. हार्दिक पांड्याने १८ आणि रमणदीप सिंगने १५ धावा केल्या. तिलक वर्माच्या या सामन्यातील शतकासह भारतीय संघ एका खास यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे.

हेही वाचा – IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?

भारतीय संघाने घडवला इतिहास

भारतीय संघाकडून या वर्षात २०२४ मधील टी-२० क्रिकेटमध्ये हे पाचवे शतक ठरले. २०२४ मध्ये कोणत्याही संघातील खेळाडूंना टी-२० क्रिकेटमध्ये भारतापेक्षा जास्त शतकं झळकावता आलेली नाहीत. जाफना किंग्सने २०२४ मध्ये आतापर्यंत टी-२० क्रिकेटमध्ये चार शतकं झळकावली होती. आता टीम इंडियाने त्यांना मागे टाकत पहिले स्थान मिळवून इतिहास लिहिला आहे.

हेही वाचा – Tilak Verma : तिलक वर्माने वादळी शतक झळकावत घडवला इतिहास, भारतासाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू

टी-२० क्रिकेटमध्ये २०२४ मध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारे संघ

भारत- ५ शतकं
जाफना किंग्स- ४ शतकं
राजस्थान रॉयल्स- ३ शतकं
ऑस्ट्रेलिया- २ शतकं
कोमिला विक्ट्रोयंस- २ शतकं

संजू सॅमसनने २०२४ मध्ये भारतासाठी सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोन शतके झळकावली आहेत. त्याच्याशिवाय रोहित शर्मा, तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी एक शतक झळकावले आहे. या खेळाडूंमुळेच भारतीय संघाने हा खास विक्रम आपल्या नावे केला आहे.

हेही वाचा – Border Gavaskar Trophy Best Innings: सचिन, द्रविड, पंत अन् बुमराहचा स्लोअर बॉल…, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासातील संस्मरणीय क्षण

भारतीय संघाकडून २०२४ मध्ये केलेली पाच शतकं: 

संजू सॅमसन- २ शतकं
अभिषेक शर्मा- १ शतक
रोहित शर्मा- १ शतक
तिलक वर्मा- एक शतक

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian cricket team creates history becomes first team to score 5 t20i international century in 2024 ind vs sa tilak varma bdg