Team India Performance in 2023 : एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या अंतिम फेरीत भारतीय क्रिकेट संघाचा पराभव झाला होता. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. पण फायनल मॅच वगळता टीम इंडियाचा एकूण रेकॉर्ड बघितला, तर तो उत्कृष्ट राहीला आहे. ऑस्ट्रेलिया विश्वविजेता बनला असला, तरी सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत ते टीम इंडियाच्या मागे राहिले. भारतीय संघाने सलग दुसऱ्या वर्षी ही कामगिरी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताने वर्ष २०२३ मध्ये सर्वाधिक सामने जिंकले. या बाबतीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तानसह सर्व संघांना मागे टाकले. टीम इंडियाने यावर्षी एकूण ६६ सामने खेळले. या काळात त्यांनी ४५ सामने जिंकले. भारतीय संघाला १७ सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. दोन सामने अनिर्णित राहिले. २०२२ मध्येही भारतीय संघ सर्वाधिक सामने जिंकणारा संघ होता. टीम इंडियाने २०२२ मध्ये ४६ सामने जिंकले होते.

२०२३ मध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत न्यूझीलंड संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने एकूण ६१ सामने खेळले आणि या काळात त्याने २९ सामने जिंकले. तसेच २७ सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. युगांडा संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ४३ सामने खेळले आणि २४ जिंकले. ऑस्ट्रेलियालाही १६ सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले.

हेही वाचा – VIDEO : विराट कोहली आणि बाबर आझमसाठी २०२४ शानदार असेल, इंग्लंडच्या माजी कर्णधाराची भविष्यवाणी

उल्लेखनीय आहे की टीम इंडियाने एका कॅलेंडर वर्षात ३५ किंवा त्याहून अधिक सामने चार वेळा जिंकले आहेत. भारताने २०१८ आणि २०१९ मध्ये ३५-३५ सामने जिंकले. यापूर्वी २०१७ मध्ये ३७ सामने जिंकले होते. टीम इंडियाने २०२२ मध्ये ४६ सामने आणि २०२३ मध्ये ४५ सामने जिंकले. या वर्षी टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत शुबमन गिल अव्वल स्थानावर आहे. तसेच विराट कोहली दुसऱ्या स्थानावर कायम आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian cricket team has won the most 45 matches in the year 2023 vbm