भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट प्रशिक्षक ठरले आहेत. Cricinfo या वेबसाईटने दिलेल्या माहितीनूसार रवी शास्त्री यांना बीसीसीआय वर्षाला अंदाजे ७ कोटींहून अधिक रुपये पगार देतं. रवी शास्त्रींना मिळणारा हा पगार कर्णधार विराट कोहलीपेक्षाही जास्त असल्याचं कळतंय. यात विराट कोहली जाहीरातीमधून मिळवतं असलेलं उत्पन्न धरण्यात आलेलं नाहीये. शास्त्रींनंतर ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन वर्षाला 3 कोटी ५७ लाख रुपयांहून अधिक पगार घेतात.
रवी शास्त्री हे विराट कोहलीपेक्षा जास्त कमाई करणारे एकमेव नसून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथही कोहलीपेक्षा जास्त कमाई करतो. स्टिव्ह स्मिथला क्रिकेट ऑस्ट्रेलिया वर्षाला अंदाजे ९ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत देते. विराट कोहलीचा बीसीसीआय वर्षाला अंदाजे ६ कोटी ५० लाख इतकी रक्कम देते.
अवश्य वाचा – भारताकडून द्विपक्षीय कराराचं पालन झाल्यास, वन-डे लीगमध्ये खेळू; पाकिस्तानचं आयसीसीवर दबावतंत्र
अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावर रवी शास्त्री यांची पुन्हा एकदा निवड झाली होती. CricInfo वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार रवी शास्त्री हे सर्वात जास्त मानधन मिळणारे क्रिकेट प्रशिक्षक ठरले आहेत. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारताच्या काही महत्वाच्या खेळाडूंच्या वार्षिक कमाईपेक्षा रवी शास्त्री यांची कमाई अवघ्या काही लाख रुपयांनी कमी असल्याचं कळतंय. त्यामुळे भारतीय संघाचे शास्त्री गुरुजी हे खऱ्या अर्थाने ‘महाग’ प्रशिक्षक ठरलेत असं म्हणायला हरकत नाही.