भारतीय क्रिकेट संघ सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईत आहे. भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये गट टप्प्यातील अखेरचा सामना होत आहे. या स्पर्धेदरम्यान टीम इंडियाचा एक महत्त्वाचा सदस्य भारतात परतला आहे. टीम इंडियाच्या या सदस्याच्या आईचे निधन झाले आहे. दरम्यान त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी अर्धवट सोडली आहे. आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने (HCA) एक निवेदन जारी करून चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ दरम्यान भारतीय संघ व्यवस्थापक आर देवराज यांच्या आईचे निधन झाले आहे. देवराज सध्या हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे (HCA) सचिव आहेत. अशा परिस्थितीत देवराज हैदराबादला परतला आहे. आर देवराज दुबईला परत जाणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, आर देवराज दुबईला परत जाणार की नाही याचा निर्णय मंगळवारी होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर होणार आहे. शोक व्यक्त करताना हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने एका निवेदनात म्हटले आहे की, “आमचे सचिव देवराज यांच्या आई कमलेश्वरी गारू यांचे निधन झाल्याचे अत्यंत दु:खाने कळवत आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. देवराज गारू आणि त्यांच्या कुटुंबीयांना आमच्या मनःपूर्वक संवेदना.”

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आधी, भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्कल यांच्या वडिलांचेही निधन झाले, ज्यामुळे त्यांना दुबईहून दक्षिण आफ्रिकेत मायदेशी परतावे लागले. मात्र, स्पर्धेदरम्यान मॉर्ने मॉर्केल दुबईला परतले आणि टीम इंडियात पुन्हा सामील झाले. पण संघाचे व्यवस्थापक आर देवराज संघासह परतणार की नाही याबाबत कोणतेही अपडेट नाही. प्रत्येक मोठ्या दौऱ्यावर टीम इंडियासाठी नवीन मॅनेजर निवडला जातो. खेळाडू, प्रशिक्षक आणि संघ यांच्यातील समन्वय आणि लॉजिस्टिक्स मॅनेजरची जबाबदारी सहसा व्यवस्थापकाची असते.

भारतीय संघाने न्यूझीलंड संघावर ४४ धावांनी विजय मिळवला असून संघाचा आता उपांत्य फेरीतील सामना ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणार आहे. हा सामना ४ तारखेला दुबईत खेळवला जाणार आहे.

Story img Loader