Team India Playing Footvolley After Reaching Hotel IND vs BAN: भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामना पूर्ण खेळवला गेला, याची शक्यता फार कमी दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी पावसामुळे चाहत्यांना सामन्याचा आनंद घेता आला नाही. पहिल्या दिवशी ३५ षटकांचा सामना झाल्यानंतर उर्वरित दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी सातत्याने सुरू असलेल्या पावसाने दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला.

दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही संघ वेळेवर मैदानावर पोहोचले होते, पण त्यांना ड्रेसिंग रूममधून बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही, त्यामुळे दोन्ही संघ सकाळी ११.३० च्या सुमारास पुन्हा हॉटेलवर परतले. यानंतर टीम इंडियाने हॉटेलमध्ये परतल्यानंतर काय केले याचा व्हीडिओ दिनेश कार्तिकने शेअर केला आहे. कार्तिकने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये भारतीय खेळाडू फूट-वॉली गेम खेळताना दिसत आहेत.

हेही वाचा – Women’s T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषकात भारताकडून शतक झळकावणारी एकमेव फलंदाज कोण? तुम्हाला माहितेय का?

भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचे खेळाडू टीम हॉटेलमध्ये फूट-वॉली खेळताना दिसले. ज्यात ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज आणि ध्रुव जुरेल हे खेळाडू सहभागी झाले होते. दुसऱ्या दिवशी खेळ सुरू झाला नाही तेव्हा १२ वाजण्यापूर्वीच संघ हॉटेलवर परतले. हॉटेलवर गेल्यानंतरही खेळाडू खेळाचा आनंद घेत होते.

माजी क्रिकेटपटू आणि समालोचक दिनेश कार्तिकने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर आणि अश्विन एका बाजूला दिसत आहेत आणि ऋषभ पंत आणि त्याची टीम दुसऱ्या बाजूला खेळताना दिसत आहेत.

हेही वाचा – Musheer Khan Health Update: मुशीर खानचा अपघातही ऋषभ पंतप्रमाणेच, अधिकृत माहिती आली समोर, मानेला फ्रॅक्चर असून मुंबईत होणार पुढील उपचार

पाऊस आणि खराब हवामानामुळे पहिल्या दिवशी केवळ ३५ षटके टाकता आली, ज्यात बांगलादेशने पहिल्या डावात तीन विकेट गमावून १०७ धावा केल्या. आदल्या दिवशी रात्रीपासून सुरू असलेला पाऊस आज सकाळी अकराच्या सुमारास थांबला असला तरी अधूनमधून पडणाऱ्या हलक्या सरींनी मैदानावरील कव्हर्स हटवण्याची संधी दिली नाही. मैदानावरील पंचांनी दुपारी २ वाजता पुन्हा मैदानाची पाहणी केली आणि खेळपट्टीच्या क्युरेटरशी चर्चा केल्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द केला असल्याची औपचारिक घोषणा केली.