टीम इंडियाने नुकतीच वेस्ट इंडिजविरूद्ध टी २० आणि एकदिवसीय मालिका जिंकली. कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात वेस्ट इंडिजवर मात केली. विंडीजने विजयासाठी दिलेले ३१६ धावांचे आव्हान भारताने ४ गडी राखून पूर्ण केले. २०१९ वर्षातला भारताचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता, त्यामुळे वर्षाची अखेर भारताने २-१ अशी मालिका विजयाने केली.

पुढील वर्षी श्रीलंकेविरूद्धच्या टी २० मालिकेने सुरूवात होणार आहे. या वर्षात टीम इंडियासमोर अनेक कठीण संघाचे आव्हान असणार आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंडसारख्या मजबूत देशांविरुद्ध टीम इंडिया दोन हात करणार आहे. २०२० मध्ये टीम इंडियाचा कार्यक्रम कसा असेल ते आपण पाहूया.

भारत वि. श्रीलंका (ठिकाण – भारत)

५ जानेवारी – पहिली टी २०, गुवाहाटी
७ जानेवारी – दुसरी टी २०, इंदोर
१० जानेवारी – तिसरी टी२०, पुणे</p>

भारत वि. ऑस्ट्रेलिया (ठिकाण – भारत)

१४ जानेवारी – पहिली वन-डे, मुंबई<br />१७ जानेवारी – दुसरी वन-डे, राजकोट
१९ जानेवारी – तिसरी वनडे, पुणे

भारत वि. न्यूझीलंड (ठिकाण – न्यूझीलंड)

२४ जानेवारी – पहिली टी २०, ऑकलंड
२६ जानेवारी – दुसरी टी २०, ऑकलंड
२९ जानेवारी – तिसरी टी २०, हॅमिल्टन
३१ जानेवारी – चौथा टी २०, वेलिंग्टन
२ फेब्रुवारी – पाचवा टी २०, माउंट माउंगानुई

५ फेब्रुवारी – पहिली वन-डे, हॅमिल्टन
८ फेब्रुवारी – दुसरी वन-डे, ऑकलंड
११ फेब्रुवारी – तिसरी वन-डे, माउंट माउंगानुई

२१-२५ फेब्रुवारी – पहिली कसोटी, वेलिंग्टन
२९ फेब्रुवारी-४ मार्च – दुसरी कसोटी, ख्राईस्टचर्च

भारत वि. दक्षिण आफ्रिका (ठिकाण – भारत)

१२ मार्च – पहिली वन-डे, धर्मशाळा
१५ मार्च – दुसरी वन-डे, लखनौ
१८ मार्च – तिसरी वन-डे, कोलकाता

IPL 2020

एप्रिल आणि मे २०२०

भारत वि. श्रीलंका (ठिकाण – श्रीलंका)

जुलै २०२० (तारखा अद्याप निश्चित नाहीत)

आशिया कप (ठिकाण – पाकिस्तान / युएई)

सप्टेंबर २०२० (तारखा अद्याप निश्चित नाहीत)

भारत वि. इंग्लंड (ठिकाण – भारत)

सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२० : ३ टी २० आणि ३ वन-डे

टी २० विश्वचषक २०२०, (ठिकाण – ऑस्ट्रेलिया)

२४ ऑक्टोबर – भारत वि. दक्षिण आफ्रिका, सुपर १२, पर्थ
२९ ऑक्टोबर – भारत वि. पात्र ठरलेला संघ, सुपर १२, मेलबर्न
१ नोव्हेंबर – भारत वि. इंग्लंड, सुपर १२, अ‍ॅडलेड
५ नोव्हेंबर – भारत वि. पात्र ठरलेला संघ, सुपर १२, मेलबर्न
८ नोव्हेंबर – भारत वि. अफगाणिस्तान, सुपर १२, सिडनी

भारत वि. ऑस्ट्रेलिया (ठिकाण – ऑस्ट्रेलिया)

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी
नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२० – ४ कसोटी आणि ३ वन-डे

Story img Loader