Indian Team to Get New Batting Coach: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताची सर्वात कमजोर कडी होती ती म्हणजे फलंदाजी. भारताचे अनेक फलंदाज चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले. विशेषत: ऑस्ट्रेलियासाठी कर्दनकाळ असलेला विराट कोहलीसारखा अनुभवी फलंदाज एकाच पद्धतीने सलग ८ वेळा बाद झाला, तर रोहित शर्माच्या खराब फलंदाजीनंतर बीसीसीआयची चिंता वाढली आहे. त्यामुळे आता बीसीसीआय नवीन निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिपोर्टनुसार, बीसीसीआयला आता कोचिंग स्टाफ मजबूत करायचा आहे आणि त्यासाठी ते नवीन पर्याय शोधत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये, विशेषत: नव्या फलंदाजी प्रशिक्षकाला सामील करण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी, बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापन यांच्यातील चर्चेनुसार सपोर्ट स्टाफला बळकट करणं आवश्यक आहे.

हेही वाचा – Wankhede Stadium: ५ किलो तांदूळ, मिक्सरपासून ते कंगवा अन् टोपीही…, वानखेडेच्या पन्नाशीनिमित्त ग्राऊंडसमॅनचा MCA ने असा केला अनोखा सत्कार

क्रिकबझच्या वृत्तानुसार, काही नावांचा विचार केला जात आहे, ज्यामध्ये देशांतर्गत क्रिकेटमधील माजी दिग्गज खेळाडूंचाही समावेश आहे. मात्र, अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. सध्या, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर व्यतिरिक्त, भारताच्या कोचिंग स्टाफमध्ये मोर्ने मॉर्केल (गोलंदाजी प्रशिक्षक), अभिषेक नायर (सहाय्यक प्रशिक्षक), रायन टेन डोशेटे (सहाय्यक प्रशिक्षक) आणि टी दिलीप (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक) यांचा समावेश आहे.

हेही वाचा – VIDEO: सॅम कॉन्स्टासला भेटण्यासाठी चाहत्याने केली घोडचूक, चालत्या गाडीतूनच उतरला अन्…

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा आणि कसोटी क्रिकेटमधील नुकत्याच झालेल्या पराभवानंतर कोचिंग स्टाफच्या भूमिकेवर आणि कार्यपद्धतीवर तीव्र टीका होत आहे. विशेषत: विराट कोहलीसारखा खेळाडू नियमितपणे एकाच पद्धतीने बाद झाल्यानंतर फलंदाजी प्रशिक्षक काय करत आहे, असे सवाल उपस्थित होत आहेत. ११ जानेवारी रोजी मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत सहाय्यक प्रशिक्षकांच्या भूमिकेवर चर्चा झाली.

हेही वाचा – INDW vs IREW: प्रतिका रावलचा वर्ल्ड रेकॉर्ड, आजवर कोणत्याच महिला फलंदाजाला जमली नाही अशी कामगिरी

क्रिकबझच्या अहवालानुसार, आढावा बैठकीत भारताच्या सपोर्ट स्टाफबाबत चर्चा झाली. मात्र, नेमकं काय झालं हे स्पष्ट झालेलं नाही. पण बीसीसीआय आता भारतीय संघाची फलंदाजी सुधारण्यासाठी तज्ञांना सपोर्ट स्टाफमध्ये सामील करण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. दुसरीकडे, टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात दावा करण्यात आला होता की, सहायक प्रशिक्षक अभिषेक नायर आणि रायन टेन डोशेट यांच्यावर टांगती तलवार आहे. त्यांच्यावर प्रश्नचिन्ह असून त्यांचा कार्यकाळही कमी होऊ शकतो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian cricket team to get new batting coach in gautam gambhir support staff bcci to take new decision bdg