इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज होण्याआधी भारतीय क्रिकेट संघाने मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबला भेट देऊन फुटबॉलमधील या बलाढय़ क्लबचा १०० वर्षांपासूनचा देदीप्यमान वारसा आणि कारकिर्दीविषयी माहिती जाणून घेतली. भारतीय संघ रविवारी ओल्ड ट्रॅफर्ड फुटबॉल मैदानावर उतरला, त्यानंतर मँचेस्टर युनायटेडच्या ड्रेसिंगरूमपासून ते ‘थिएटर ऑफ ड्रिम्स’ या सर्वाना त्यांनी भेट दिली. मँचेस्टर युनायटेडच्या डगआऊटमध्ये जाऊन त्यांनी छायाचित्रणही केले. तसेच मैदानावर जाण्यासाठी त्यांनी विशेष परवानगी घेतली होती. अन्य खेळाडू छायाचित्रे काढण्यात मग्न असले तरी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि गौतम गंभीर हे क्लबच्या पदाधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेत होते. मँचेस्टर युनायटेडच्या दुकानातून भारतीय खेळाडूंनी खरेदीही केली. त्यानंतर खेळाडूंनी फुटबॉलचा सरावही केला. भारतीय संघाचा यष्टिरक्षक असलेल्या धोनीने गोलरक्षणाची जबाबदारी सांभाळली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा