टीम इंडियाचे क्रिकेटपटू आपल्या  विविध गोष्टींमुळे चर्चेत असतात. नव्या जाहिराती, नवे लूक्स या गोष्टींमुळे हे क्रिकेटपटू सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता असाच एक क्रिकेटपटू आपल्या नव्या हेअरस्टाईलमुळे चर्चेत आला आहे. या क्रिकेटपटूने बॉलिवूड चित्रपट गजनी फेम आमिर खानची हेअरस्टाईल केली आहे.

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा आणि टीम इंडियाचा गोलंदाज दीपक चहरने गजनी हेअरस्टाईल केली आहे. चहरने इन्स्टाग्रामवरून आपले नवीन लूकमधील फोटो पोस्ट केले. या लूकमध्ये तो एकदम खतरनाक दिसत आहे. अनेकांनी त्याला या लूकरवर जबरदस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने त्याला बाहुलबलीचा खलनायक असेही म्हटले.

हेही वाचा – ‘‘…तर डिव्हिलियर्ससारखे मोठे खेळाडू पाकिस्तान सुपर लीगकडे आकर्षिक होतील”

 

मागील काही काळापासून चहरने चेन्नई सुपर किंग्जसाठी दमदार कामगिरी केली आहे. या सर्वांचे श्रेय त्याने महेंद्रसिंह धोनीला दिले होते. चहरने एका मुलाखतीत सांगितले, “माही भाईंच्या नेतृत्वाखाली खेळणे हे माझे स्वप्न होते. त्यांच्या नेतृत्वात मी बरेच काही शिकलो आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझा खेळ दुसर्‍या स्तरावर नेला. त्यांनी नेहमीच मला साथ दिली. जबाबदारी कशी घ्यायची हे त्यांनी मला शिकवले.”

हेही वाचा – ‘‘टीम इंडियाला माझी गरज, मी कौशल्य दाखवलं तर वर्ल्डकप जिंकता येईल”

आगामी श्रीलंका दौर्‍यावर शिखर धवनच्या हाती भारतीय संघाची असावी, असे चहरला वाटते. शिखर धवन कर्णधारपदासाठी एक चांगला पर्याय असल्याचे चहरने सांगितले. तो म्हणाला, ”शिखर भाई बर्‍याच काळापासून क्रिकेट खेळत आहे आणि त्याच्याकडे खूप अनुभव आहे, त्यामुळे कर्णधारपदासाठी तो चांगला पर्याय आहे. सर्व खेळाडू धवनचा खूप आदर करतात आणि ते त्याचेही पालन करतील. खेळाडूंनी कर्णधाराचा आदर करणे अत्यंत महत्वाचे आहे.”

Story img Loader