Indian cricketer Rahul Chahar father was cheated of Rs 26.50 lakh : भारतीय क्रिकेटपटू राहुल चहरचे वडील देशराज सिंह चहर याच्यासोबत फसवणुक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. अहवालानुसार, एका बिल्डरने त्यांची २६.५० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी आता जगदीशपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आता त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नरसी विलेजचे मालक वासुदेव गर्ग, कर्मचारी अरुण गुप्ता आणि पियुष गोयल यांनी एका जमिनीवर घर बांधण्यासाठी पैसे घेतले होते. पण त्यांनी ना नोंदणी केली ना घर बांधले. आरोपी जवळपास १२ वर्षांपासून कारणं देत आहेत.

पैसे मागितल्यावर धमकी दिल्याचा आरोप –

राहुल चहरच्या वडिलांनी कंपनीशी संबंधित तीन जणांवर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. १२ वर्षांपासून या प्रकरणाची काळजी वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदुस्थानच्या वृत्तानुसार, जेव्हा ते ५ जून २०२४ रोजी विक्रीच्या करारावर स्वाक्षरी करण्याच्या मागणीसाठी अरुण गुप्ता आणि पीयूष गोयल यांच्याशी शेवटचा संपर्क साधला, तेव्हा दोघांनीही त्यांना शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्याची पुन्हा भेट झाली नाही. डीसीपी सिटी सूरज कुमार राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल चहरच्या वडिलांकडे घरासाठी दिलेल्या पैशांचा पुरावा आहे. त्याच आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुराव्याच्या आधारे तपास करून कारवाई केली जाईल.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

राहुल चहरचे वडील देशराज सिंह चहर यांनी मे २०२४ मध्ये याप्रकरणी तक्रार केली होती. यानंतर पोलिसांनी प्रथम तपास केला आणि जेव्हा बिल्डर भूखंडावर बांधलेले घर देण्यास तयार नव्हते, तेव्हा त्यांनी गुन्हा दाखल केला. राहुतच्या वडिलांच्या तक्रारीनुसार, कंपनीचे मालक वासुदेव गर्ग यांनी नरसी व्हिलेज नावाने वसाहत बांधली आहे. २०१२ मध्ये त्यांनी याच कॉलनीत दोन प्लॉट बुक केले होते, ज्यावर कंपनी घर बांधणार होती. बिल्डरने २०१६ मध्ये त्यातील एक भूखंड दुसऱ्याला विकला.

हेही वाचा – IND vs BAN : भारत-बांगलादेश टी-२० मालिकेचे लाइव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहता येणार? जााणून घ्या

राहुलच्या वडिलांना याची माहिती मिळताच त्यांनी वासुदेव गर्ग यांच्याकडे त्यांची अनामत रक्कम मागितली, ती त्यांना परत मिळाली. यानंतर देशराज सिंह यांनी २०१८ मध्ये मुलगा राहुल चहरच्या नावावर दुसरा प्लॉट हस्तांतरित करण्यासाठी अर्ज केला. त्यासाठी त्याच्याकडून ३२ हजार रुपये ट्रान्सफर फी घेण्यात आली, जो कंपनीने आजपर्यंत त्याच्याकडे सुपूर्द केलेला नाही. एवढेच नाही तर प्लॉटवर घर बांधण्यासाठी २६.५० लाखांची उर्वरित रक्कमही दिली आहे. मात्र, घर बांधून झाल्यानंतरही बिल्डरने ते त्यांना दिले नाही. त्यामुळे बिल्डर प्लॉटप्रमाणे घर दुसऱ्याला विकण्याची तयारीत असल्याचा आरोप, राहुल चहरच्या वडिलांनी केला आहे.