सध्या आशिया चषक स्पर्धेची सगळीकडे धूम असून आजच्या भारत-पाकिस्तान सामन्यात कोणाचा विजय होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीसाठीदेखील आजचा सामना खास ठरणार आहे, कारण तो आपला १०० वा टी-२० क्रिकेट सामना खेळतोय. दरम्यान, एकीकडे भारत-पाक सामन्याची सर्वांना उत्सुकता लागलेली असताना भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज राहुल शर्मा याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलंय. यापूर्वी त्याने आयपीएल क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी केलेली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Asia Cup 2022 IND Vs PAK LIVE: सिनेमागृहात पहा भारत-पाकिस्तान सामना; तुमच्या शहरात कुठे कराल बुकिंग?

राहुल शर्मा आपल्या करिअरमध्ये आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांकडून खेळून दिमाखदार कामगिरी केलेली आहे. आयपीएलसोबतच त्याने भारतीय क्रिकेट संघाचेदेखील प्रतिनिधित्व केलेले आहे. त्याने चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तसेच दोन टी-२० सामन्यात भारतीय संघासाठी गोलंदाजी केली. मात्र करिअरला निश्चित दिशा मिळालेली असताना त्याच्यावर ड्रग्ज सेवनाचे आरोप करण्यात आले. परिणामी निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी त्याला बराच काळ झगडावे लागले. ऐन उमेदीच्या काळात त्याला भारतीय क्रिकेट संघातील स्थान गमवावे लागले.

हेही वाचा >>> IND vs Pak सामन्याआधी विराट कोहलीचे मोठे विधान, म्हणाला ‘पाकिस्तानचा बाबर आझम जगातील अव्वल फलंदाज’

राहुल शर्माचे क्रिकेट करिअर

राहुल शर्माने आयपीएल क्रिकेटमध्ये २०१० साली पदार्पण केले. या हंगामात त्याने डेक्कन चार्जर्स संघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर २०११ च्या हंगामात तो पुणे वॉरिअर्स संघाकडून खेळला. या हंगामात त्याने एकूण १६ विकेट्स घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर त्याला भारतीय संघातही स्थान देण्यात आले. २०१४ सालच्या आयपीएल हंगामात तो दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळला. त्यानंतर २०१५ साली त्याला चेन्नई सुपर किंग्ज संघाने खरेदी केले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian cricketer rahul sharma announced retirement in all cricket form amid asia cup 2022 ind vs pak match prd